Salman Khan on Arbaaz and Malaika's Divorce : बॉलिवूड अभिनेका सलमान खाननं नुकतीच पुतण्या अरहान खानचा पॉडकास्ट 'डंब बिर्यानी' मध्ये आले होते. त्यानं अरहान आणि त्याच्या मित्रांसोबत करिअरविषयी चर्चा केली. त्यांना नाती टिकवण्यावर आणि फसवणूक करण्यावरून देखील अनेक गोष्टी सांगितल्या. यावेळी बोलताना सलमाननं मलायका आणि भाऊ अरबाज खानसोबतच्या घटस्फोटाचा देखील उल्लेख केला आणि अरहान विषयी बोलला की त्यानं आयुष्यात खूप काही सहन केलं. त्यानंतर सलमाननं अरहानला सल्ला दिला की त्यानं स्वत: च्या पायावर उभ रहायला हवं.
सलमाननं सगळ्यात आधी अरहान आणि त्याचे मित्र हिंदीमध्ये बोलत नाही यामुळे ओरडा दिला. त्यानंतर अरहानला भविष्यात काय करायचं आहे त्यावरून अनेक गोष्टी सांगितल्या. त्यानं विचारलं की अरहानला भविष्यात काय करायचं आहे? उत्तर देत त्याचे मित्र म्हणाले की त्याला रेस्टॉरंट सुरु करायचं आहे. हे ऐकूण सलमानला आश्चर्य झालं आणि त्यानं अरहानला विचारलं की जर तुला रेस्टॉरंट सुरु करायचं आहे तर मग त्या सगळ्या क्लासेसचं काय, जे तू जॉईन केले होते? फायटिंग आणि जिमनॅस्टिक तू करत होतास ना, त्याचं रेस्टॉरंटमध्ये काय करशील?
पुढे सलमाननं अरबाज आणि मलायकाच्या घटस्फोटाचा उल्लेख केला. त्यानं अरहानकडे इशारा करत सांगितलं की 'या मुलानं आयुष्यात खूप चढ-उतार पाहिले आहेत. तुमचे आई-वडील विभक्त झाल्यानंतर स्वत: च्या पायावर उभ राहणं. एक दिवस तुझं स्वत: चं कुटुंब आणि यूनिट असेल. तर तुला तुझं कुटुंब राहण्यासाठी यावरच काम करावं लागेल.'
सलमाननं पुढे सांगितलं की 'कुटुंबासोबत दुपारी किंवा रात्री जेवण करण्याची पद्धत ही कायम रहायला हवी. कुटुंबात किंवा घरात कोणीतरी एक मोठं असायला हवं. त्याचा नेहमी आदर करणं गरजेच आहे.'
हेही वाचा : चित्रपटाच्या कमाईच्या बाबतीत आमिर खानच्या मुलाला हिमेश रेशमियानं टाकलं मागे
अरबाज आणि मलायकानं 12 डिसेंबर 1998 मध्ये लग्न केलं होतं. आधी ते रिलेशनशिपमध्ये होते त्यानंतर त्यांनी लग्न केलं. लग्नाच्या 20 वर्षानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. त्याच्या काही काळानंतर अरबाजनं शूरा खानशी दुसरं लग्न केलं. तर मलायका ही अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण काही काळापूर्वी त्यांचा ब्रेकअप झाल्याचं स्वत: अर्जुन कपूरनं सांगितलं.