Delhi Election Result 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान पार पडलं. 70 जागांसाठी आम आदमी पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांनी कंबर कसली होती. अशातच आज दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. दिल्लीमध्ये कोणाची सत्ता येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु, निवडणुकीत दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला. निकालांनुसार, भाजपला 48 जागा तर आपला फक्त 22 जागा मिळाल्या आहेत.
दिल्ली निवडणुकीत भाजपच्या दणदणीत विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्ष मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी दिल्लीला आपदामधून मुक्त केलं. दिल्लीकरांमध्ये आज वेगळाच उत्साह दिसतोय म्हणत नरेंद्र मोदी यांनी दिल्लीकरांचे आभार मानले. दिल्लीकरांनी मोदीच्या गॅरंटीवर विश्वास ठेवला. आजचा विजय हा ऐतिहासिक विजय आहे. डबल इंजिन सरकार दिल्लीचा डबल विकास करणार. भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी दिवसरात्र मेहनत घेतली. दिल्लीतील जनतेने स्पष्ट केलं, दिल्लीचे मालक दिल्लीची जनता म्हणत कार्यकर्त्यांचं कौतुक देखील मोदींनी केलं.
एनडीए म्हणजे विकासाची हमी, सुशासनाची हमी
जनतेनं शार्टकटच्या राजकारणाला नाकारलं. राजकारणात खोटं बोलणाऱ्यांना दिल्लीकरांनी नाकारलं. तरुण पिढी पहिल्यांदाच भाजपचं सुशासन बघणार. भाजप कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे विजयाला महत्व. दिल्लीत विश्वास आणि विकासाचा विजय झालाय. हरियाणा, महाराष्ट्रात भाजपनं नवा रेकॉर्ड बनवला. दिल्ली मिनी हिंदूस्थान आहे, लघु भारत आहे. सब का साथ, सब का विकास, और पुरी दिल्ली का विकास. 'आप'दावाल्यांनी मेट्रोचं काम थांबवलं होतं. आयुष्यमान योजनेचा लाभ मिळू दिला नाही असा आरोप नरेंद्र मोदी यांनी आपवर केला आहे.
दिल्लीचे मालक बनू पाहणाऱ्यांना जनतेनं घरी बसवलं. जिथं NDA तिथे विकासाने नवी उंची गाठली. सरकारच्या योजनांचा जास्त लाभ मध्यमवर्गीयांना मिळतो. आमच्या पक्षानं नेहमी मध्यमवर्गीयांना प्राथमिकता दिली. प्रत्येक राज्यात महिलांना दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण केली. आमचं सरकार दिल्लीला एक आधुनिक शहर बनवणार असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.