Haldi Tea and its health benifits: उत्तम आरोग्यासाठी आपल्या जेवणात पूर्वापार हळदीचा वापर केला जातो. हळद एक अशी औषधी आहे ज्याने आपलं आरोग्य सुधृढ राहण्यास मदत होते. याच हळदीचा वापर करून तुम्ही हळदीचा चहा बनवू शकतात. हा चहा आरोग्यासाठीही अत्यंत फायद्याचा मानला जातो. चला तर मग जाणून घेऊयात कसा बनवायचा हळदीचा आरोग्यवर्धक चहा. ( How to make haldi tea )
हा चहा कसा बनवायचा हे आपण या बातमीत जाणून घेणारच आहोत. मात्र, नेमका हा चहा असतो तरी काय याबाबतही जाणून घेणं गरजेचं आहे. या चहामध्ये आपण दररोज सेवन करता असलेला चहा नसतो. यामध्ये साखरही वापरली जात नाही. त्याऐवजी यामध्ये पाणी, हळद, दालचिनी, आलं, लिंबाचा रस आणि मधाचा वापर केला जातो. या चहात आयुर्वेदिक सामग्री खच्चून भरलेल्या असल्याने हा चहा अत्यंत आरोग्यवर्धक मानला जातो.
सामग्री: अर्धा चमचा हळद, 1 कप पाणी, चिमूटभर काळ्या मिरीची पावडर, आवडीनुसार, स्वादानुसार लिंबाचा रस
हळदीयुक्त चहा पिण्याने तुमचं लिव्हर डिटॉक्स होण्यास मदत होते.
या चहाने तुमच्या लिव्हरमधील विषारी तत्व बाहेर पडण्यास सुरुवात होते
हळदीत अँटी ऑक्सिडंट्स आणि डिटॉक्सिफिकेशन गुणधर्म असतात जे तुमच्या आरोग्यास फायद्याचे ठरतात
हा चहा तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो. एका रिसर्चनुसार हृदयावरील सूज किंवा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे तुमचं हृदय बंद होण्याचं प्रमाण वाढतं. अशात हळदीच्या चहाने तुमचं हृदय सुधृढ राहण्यास मदत होते. हळदीतील अँटीइंफ्लामेंटरी आणि अँटीऑक्सिडंट्स गुणधर्मांमुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते. हळदीमधील कार्डिओव्हॅस्क्युलर प्रोटेक्टिव्ह एजंटमुळे तुमचं हृदय निरोगी राहण्यास मदत होते.
हळदीचा चहा मधुमेहाची जोखीम कमी करण्यास मदतशीर ठरतो. हळदीतील करक्युमिनमुळे डायबिटिसने होणाऱ्या त्रासापासून मदत करते. करक्युमिनमधील अँटिबायोटिक गुणधर्मांमुळे हे शक्य होतं. अँटिबायोटिक गुणधर्मांमुळे शरीरातील ग्लुकोजचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
कॅन्सरपासून बचावासाठी तुम्ही हळदीच्या चहाचं सेवन करू शकतात. हळदीतील करक्युमिन ट्युमरच्या पेशी रोखण्याचं काम करतात. यामध्ये अँटीकॅन्सर गुणधर्म असतात. हळदीमधील या गुणधर्मांमुळे प्रोस्टेट, स्तन, स्वादुपिंड आणि मेंदूच्या कँसरच्या धोक्यापासून बचाव होतो. मात्र, आपल्याला हेही लक्षात ठेवायला हवं की हळदीचा चहा कोणत्याही कॅन्सरवरील इलाज नाही. कॅन्सरवर डॉक्टरांचा सल्ला घेणंच योग्य ठरेल.
massively healthy turmeric tea its recepie and how it good for health and cancer