Symptoms of Mental Disorder: मानसिक आजार हा सध्याच्या जगाचा गंभीर विषय झाला आहे. वाढती स्पर्धा, बदलतं समाजकारण, राजकारण, जीवनशैली, आरोग्य आणि लग्नसंस्था यांमुळे फार मोठ्या प्रमाणात अनेकांना मानसिक आजारांना सामोरे जावे लागते आहे. त्यातून हा मानसिक आजार (Mental Health Awareness) वाढण्याचे प्रमाण हे तरूणांमध्ये जास्त आहे. आजच्या तरूणाईपुढे अपेक्षांचे ओझे, स्पर्धा, आर्थिक उद्दिष्टे, रिलेशनशिप्स आणि करिअर या सर्वांचे आव्हान आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या मानसिक आरोग्याला जपणेही आवश्यक ठरले आहे.
आपल्या कुटुंबांतील व्यक्तीही मानसिक आजारांचा बळी ठरू शकते परंतु अशावेळी आपल्या आप्तांना आणि मित्रपरिवाराला सांभाळून घेणे आवश्यक ठरते. तेव्हा जर का तुमच्या परिवारातील कोणा एका व्यक्तीला मानसिक आजार आहे असं वाटतं असेल तर वेळीच ही लक्षणे (Youth and Mental Health) ओळखा आणि त्या व्यक्तीला सहकार्य करा. (mental health dont ignore to these Mental Disorder Symptoms)
आपल्या आजूबाजूच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती ही अनेकदा मानसिक आजारांसाठी कारणीभूत ठरतात. ही आजार अनुवांशिकही असू शकतो. परंतु त्याकडे दुर्लेक्ष करून चालणार नाही. आज जगासमोरील आव्हानं आहे ते म्हणजे डिप्रेशन - उदासिनता. हा आजार अधिक बळकावला तर त्याचे पर्यवसन म्हणजे आजारानं त्रस्त असलेली व्यक्ती ही स्वत:च्या जीवाचे काहीतरी बरेवाईटही करून घेऊन शकते. अशावेळी त्यांना सांभाळणंही मुश्किल होऊ जाते. तेव्हा जाणून घ्या की नक्की मानसिक आजारांची लक्षणे काय असतात?
सध्या कामाचा ताण हा वाढू लागला आहे तेव्हा अनेक स्ट्रेस आणि चिंता या मानसिक विकारांना ग्रासायला सुरूवात केली आहे. तुम्हाला माहितीये का की यामध्ये अॅनझायटी डिसॉडर (Anxiety Disorder) हा विकार वाढू शकतो. चिंता करणं आणि सतत भविष्याबद्दल चिंताग्रस्त राहणं यामुळे लोकांमध्ये ताणतणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. तेव्हा अशावेळी आपल्याला आपल्या विचारांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
यामध्ये नको ते विचार सतत येत राहतात. खूप थकवा येतो. चिडचिड होते, काळजी आणि चिंता वाटत राहते. मनं दु:खी आहे असे वाटते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)