5 Minute Workout: सकाळी केवळ 5 मिनिटं करा या एक्सरसाईज, Belly Fat होईल कमी

 5 मिनिटं वर्कआउट करून तुम्ही खरोखरच बेली फॅट बर्न करू शकता.

Updated: Apr 16, 2022, 07:26 AM IST
5 Minute Workout: सकाळी केवळ 5 मिनिटं करा या एक्सरसाईज, Belly Fat होईल कमी title=

मुंबई : बेली फॅट कमी करण्यासाठी व्यायाम आणि डाएट करताय पण तरीही काही फायदा होत नाहीये का? जर तुमच्या पोटाची चरबी फक्त 5 मिनिटं व्यायाम करून कमी करता आली तर? तुम्हाला खोटं वाटेल पण सकाळी 5 मिनिटं वर्कआउट करून तुम्ही खरोखरच बेली फॅट बर्न करू शकता.

तुम्हाला हा 5 मिनिटांचा पोटाचा व्यायाम आठवड्यातून फक्त 5 दिवस करावा लागेल. या वर्कआउटमध्ये दिलेले व्यायाम पोटाची चरबी कमी करण्यास तसंच तुमची शारीरिक शक्ती वाढवण्यास मदत करतील.

बेली फॅट कमी करण्यासाठी एक्सरसाईज

वॉल सिट

वॉल सिटचा प्रामुख्याने तुमच्या शरीराच्या खालच्या भागावर परिणाम होतो. यामुळे स्नायूंचा स्टॅमिना वाढतो. वॉल सिट पोटाची चरबी कमी करण्यास देखील मदत करते. हा व्यायाम देखील 1 मिनिट सतत करावा लागेल.

पुश-अप्स

पुश-अप्स पोटाची चरबी कमी करण्यास त्याचप्रमाणे स्नायू तयार करण्यास मदत करतात. पुश अप्स करून छाती, बायसेप्स, ट्रायसेप्स आणि खांदे मजबूत होतात. पण त्याचसोबत पोटाच्या स्नायूंमध्ये एक आवश्यक ताण येतो आणि त्यामुळे चरबी कमी होऊ लागते. 

क्रंचेस

पोटाची चरबी कमी करण्यासाठी क्रंच हा एक उत्तम व्यायाम आहे. कारण त्याचा थेट परिणाम तुमच्या पोटाच्या स्नायूंवर होतो. पोटाची चरबी कमी करण्यासाठी 5 मिनिटांच्या वर्कआउटमध्ये 1 मिनिट क्रंचेस करावे लागतात.

स्क्वॅट्स

पोटाच्या चरबीबरोबरच मांड्या आणि नितंबांवरही चरबी येण्याचा धोका असतो. या भागांची चरबी कमी करण्यासाठी स्क्वॅट्स हा एक अतिशय प्रभावी व्यायाम आहे. स्क्वॅट्स केल्याने, हॅमस्ट्रिंग्स, पायांचे स्नायू देखील मजबूत केले जाऊ शकतात.