मुंबई : तुम्ही आठवड्यातून ५ दिवस व्यायाम करता तरीही त्याचा परिणाम जाणवत नाही का? यासाठी तुम्ही व्यायमानंतर लगेचच काय खाता हे महत्त्वाचे आहे. कारण वजन कमी न होण्यास त्या गोष्टी जबाबदार ठरतात. व्यायामानंतर तुमच्या होणाऱ्या खाण्या-पिण्याचा चुका त्यास कारणीभूत ठरतात. तर जाणून घेऊया व्यायामानंतर काय खाणे योग्य ठरेल...?
वजन कमी करताना तुम्ही किती व्यायाम करता यापेक्षा तुम्ही किती खाता, काय खाता याला अधिक महत्त्व आहे. त्यामुळे व्यायामानंतर योग्य ते अन्नपदार्थ योग्य प्रमाणात खा.
व्यायामानंतर स्नायूंना अधिक प्रमाणात ग्लुकोजची गरज असते. धान्य, डाळी, फळे आणि भाज्या यातून तुम्हाला भरपूर प्रमाणात ग्लुकोज मिळेल.
व्यायामाचे फायदे अधिक करण्यासाठी व्यायामानंतर प्रोटीन्स घेणे गरजेचे आहे, हा गैरसमज आहे. जर तुमच्या आहारात पुरेशा प्रमाणात प्रोटीन असेल तर व्यायामानंतर तुम्हाला अतिरिक्त प्रोटीन्स घेण्याची आवश्यकता नाही.
व्यायामानंतर बियर घेतल्यास रिबिल्ड आणि रिकव्हर होण्याची स्नायूंची क्षमता कमी होईल.
हलका व्यायाम केल्याने देखील थोड्या प्रमाणात डिहायड्रेशन जाणवते. म्हणून व्यायामानंतर पुरेसे पाणी प्या.