मुंबई : 'बाहुबली' चित्रपटातून घराघरात पोहचलेल्या आणि आपल्या दमदार अभिनय कौशल्याने, पिळदार शरीर यष्टीने चाहत्यांमध्ये अभिनेता राणा दग्गुबातीने खास क्रेझ निर्माण केली आहे. मात्र मागील काही दिवसांमध्ये राणा दग्गुबातीच्या आरोग्याबाबत सोशल मीडियामध्ये खास चर्चा रंगत आहे.
Hearing lots of strange things about my health, I’m fine guys just some BP based issues I’m addressing. Will be fixed and sorted soon. Thanks for the concern and love but don’t speculate it’s my health not yours ;).
— Rana Daggubati (@RanaDaggubati) June 24, 2018
राणा दग्गुबातीची किडनी निकामी झाल्याच्या अफावा गेले कही दिवस सोशल मीडियावर पसरत आहेत. कदाचित त्याची किडनी ट्रान्सप्लान्ट करावी लागेल याबाबतही चर्चा रंगली.
काही रिपोर्ट्सनुसार राणाची आई किडनीदान करणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. सोबतच ही शस्त्रक्रिया अमेरिका आणि सिंगापूरमध्ये होणार असल्याची माहिती पसरवली जात होती. मात्र या सार्या चर्चांवर आता खुद्द राणा दग्गुबत्तीनेच पूर्णविराम लावला आहे. या निव्वळ अफवा असल्याचे त्याने स्पष्ट केलं आहे.
राणा दग्गुबातीने त्याच्या आरोग्याबाबत आपण अजीब गोष्टी ऐकत असल्याचं ट्विटच्या माध्यमातून सांगितले. मी ठीक आहे. मात्र केवळ रक्तदाबाशी निगडीत त्रास होत आहे असे त्याने सांगितले आहे. त्यावर उपचार सुरू असून लवकरच त्यामधून बाहेर पडेन असे त्यांनी सांगितले.
माझ्या आरोग्याबाबत काळजी केल्याचे, माझ्यावर प्रेम दाखवल्याबद्दल आभार. माझ्या आरोग्याबाबत तर्क वितर्क लावत बसू नका असा सल्लाही त्याने दिला आहे.
राणा सध्या ' हाथी मेरे साथी' चित्रपटामध्ये व्यस्त आहे. हा सिनेमा राजेश खन्नांच्या सुपरहीट सिनेमाचा रिमेक आहे. ट्रिनिटी पिक्चरच्या बॅनरखाली हा सिनेमा हिंदी, तेलगू आणि तमिळमध्ये प्रदर्शित होणार आहे.