तळणीसाठी वापरलेलं तेल पुन्हा आहारात वापरल्यास 'या' गंभीर आजाराचा धोका !

पावसाळ्याच्या दिवसात भजी, वड्या, पुर्‍या तळण्याचं प्रमाण अधिक असते. 

Updated: Jun 26, 2018, 06:33 PM IST
तळणीसाठी वापरलेलं तेल पुन्हा आहारात वापरल्यास 'या' गंभीर आजाराचा धोका ! title=

मुंबई : पावसाळ्याच्या दिवसात भजी, वड्या, पुर्‍या तळण्याचं प्रमाण अधिक असते. या दिवसांमध्ये घरात तळल्यानंतर कढईत राहिलेले तेल तसेच ठेवले जाते. दुसर्‍यादिवशी नवा पदार्थ बनवताना हे तेल पुन्हा वापरतात. अशाप्रकारे पुन्हा पुन्हा तेलाचा वापर करणं तुम्हांला स्मार्ट उपाय वाटत असला तरीही यामुळे तुम्ही आरोग्याची हेळसांड करत आहेत. ऋजुता दिवेकरच्या 'या' डाएट टीप्सने पावसाळ्यात रहा हेल्दी !

आरोग्याला धोकादायक 

कॅन्सरचा धोका 

एकदा वापरलेलं तेल पुन्हा वापरणं आरोग्यासाठी धोकादायक आहे. यामुळे कॅन्सरचा धोका बळावू शकतो. तेल पुन्हा पुन्हा गरम केल्याने त्यामध्ये फ्री रॅडिकल्सचा निर्मिती होते. अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक कमी होतात.परिणाम शरीरात कॅन्सर सेल्सची निर्मिती होते. म्हणूनच एकदा तळण्यासाठी वापरण्यात आलेलं तेल आरोग्याला त्रासदायक ठरतं.  कॅन्सरपासून वाचवणारे नऊ खाद्यपदार्थ....

हृद्यविकार 

कॅन्सरच्या सोबतीने तळण्यासाठी वापरलेलं तेल शरीरात कोलेस्ट्रेरॉलचं प्रमाण वाढवण्यास कारणीभूत ठरतं. यामुळे हृद्यविकार, मधूमेहाची शक्यता वाढते. आता हार्ट अटॅकपूर्वीच धोका ओळखणं शक्य ! तसंच  'या' रक्तगटाच्या रुग्णांंना हार्टअटॅकचा धोका कमी , संशोधकांंचा नवा खुलासा  तुम्हांला ठाऊक आहे का?