मुंबई : अनेकदा रिलेशनशीपमध्ये मुलं कमिटमेंट देण्यासाठी तयार नसतात. त्यामुळे मुलींना अनेकदा त्यांच्याबद्दल खात्री वाटत नाही. अशावेळेस मुलांच्या लहान सहान गोष्टींवरून तुम्ही योग्य मुलासोबत नात्यामध्ये आहात. आणि हे नातं तुम्ही पुढच्या टप्प्यावर नेऊ शकतात याची तुम्हांला खात्री मिळू शकते. मग तुमच्या साथीदारामध्ये या गोष्टी असतील तर त्यांना गमवू नका.
सौंदर्य हे केवळ चेहर्यावर नसावे. जर तुमचा साथीदार बाहेरील आणि आतील सौंदर्यालाही दाद देऊ शकत असेल तर सहाजिकच त्याला तुमची कदर आहे.
पुरूषाचं व्यक्तिमत्त्व हे त्याच्या संस्कारांवर, त्याच्या जडणघडणीवर अवलंबून असतं. त्यामुळे जर तुमच्या साथीदाराच्या बोलण्यातून, वागणुकीतून तुम्हांला सकारात्मकता मिळत असेल तर तो तुमच्यासाठी योग्य साथीदार आहे.
स्त्रियांमध्ये सतत मूड स्विंग्स होतात परिणामी त्याच रूपांतर अनेकदा भांडणामध्ये होतं. मात्र जो पुरूष त्याच्या साथीदाराला प्रत्येक स्थितीमध्ये समजून घेत असेल, मदतीसाठी पाठिशी खंबीर उभा राहत असेल तर त्याला गमवू नका.
कोणतीच व्यक्ती परिपूर्ण नसते. जेव्हा पुरूष स्वतःमधील कमतरतेवर मात करून बदल करण्यासाठी प्रयत्न घेत असतो तेव्हा त्याला दाद द्या. असे पुरूष अनेकदा स्वतःच्या प्रत्येक गोष्टीसाठी श्रेय घेणं टाळतात.
कोणत्याही नात्यामध्ये स्त्रीला सुरक्षिततेची भावना जाणवणं महत्त्वाचे वाटत असते. जेव्हा पुरूष तिच्या साथीदाराला पाठिंबा देण्यासाठी सज्ज असतो तेव्हा नकळत तो तिला विश्वास देत असतो.
तुमच्यासाठी दरवाजा उघडणं, मुलांना सांभाळताना होणारी कसरत सांभाळणं, घरगुती कामांमध्ये मदत अशा गोष्टी लहान वाटत असल्या तरीही यामधून तुम्हांला पाठिंबा देत असतात.
नात्याचा पाया विश्वासावर, खरेपणावर अवलंबून असतो. चांगला -वाईटपणा, त्याचा नात्यावर होणारा परिणाम लक्षात घेता जेव्हा तुमचा साथीदार प्रत्येक गोष्ट जेव्हा उघडपणे बोलतो. तेव्हा त्याची बाजू समजून घ्या. अशा प्रामाणिकपणा दाखवणार्या साथीदाराला समजून घ्या.
कधी रागाच्या भरात असो किंवा कधी ताणतणावामुळे, अनेकदा माणसाचा स्वतःवरील तोल जातो. मात्र कठीण स्थितीमध्येही ज्याचा संयम ढळत नाही त्याला तुमच्या आयुष्यातून गमवू नका.
विश्वास हा प्रेमासारखाच न लादता, कमवावा लागतो. जेव्हा तुमचा साथीदार प्रयत्नाने हा विश्वास कमावतो, जपतो आणि टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा तो नात्यामध्ये खरंच प्रामाणिक असतो. अशा विश्वासाला तडा जाऊ देऊ नका.
अहंकाराने नातं अधिक झपाट्याने संपतं. त्यामुळे जेव्हा तुमचा साथीदार नात्यामध्ये अहंकार बाजूला सारत जेव्हा तुम्हांला प्राधान्य देतो. तुमची साथ देतो तेव्हा त्यालाही तुमच्या साथीची गरज असते हे जाणून घ्या.