मुंबई : वाढलेलं ऊन आणि सतत वाहणाऱ्या घामाच्या धारा यामुळे टाळू, केस चिकचिकीत होतात व केसांच्या अनेक समस्या उद्भवतात.
यंदाच्या उन्हाळ्यात ऊन व घामामुळे होणारे केसांचे नुकसान टाळण्यासाठी आणि केसांचे सौंदर्य राखण्यासाठी हे उपाय नक्की ट्राय करा. हे उपाय केसांसाठी अत्यंत फायदेशीर असून करण्यास देखील सोपे आहे.
नेहमीप्रमाणे केस धुवा आणि शेवटी ग्रीन टी ने केस धुवा. ग्रीन टी मुळे केस वाढतात आणि त्यात असलेल्या सनस्क्रीन गुणधर्मांमुळे उन्हापासून केसांचे संरक्षण होते.
जास्वंद केशवर्धक असल्याचे आपण सगळेच जाणतो. शॅम्पू आणि कंडिशनरने केस धुण्यापूर्वी जास्वंदीची फुले पाण्यात उकळवा व त्या पाण्याचा वापर केस धुण्यासाठी करा.
१ मोठा कप थंड पाण्यात त्यापेक्षा निम्मं अॅपल सायडर व्हिनेगर घालून केस धुवा. केस चमकदार होतील.
आपल्यापैकी बऱ्याचजणांना बियरचे सौंदर्यवर्धक फायदे माहित आहेत. बियरमुळे केस व त्वचा चमकदार होते. पाण्यात अर्धा कप बीयर घालून केस धुवा आणि फरक अनुभवा.
ग्रीन टी प्रमाणे यामध्ये देखील केसवाढीचे गुणधर्म असतात. ब्लॅक टी मध्ये असलेल्या कॅफेनमुळे केसांची वाढ होते. उन्हाळ्यात केस धुण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.