मुंबई : चहा हे बहुतेक लोकांच्या आवडत्या पेयांपैकी एक आहे. आपल्यापैकी बहुतेक जण त्यांच्या दिवसाची सुरुवात चहाच्या पहिल्या घोटाने करतात. काही जणं तर दिवसातून 4 ते 5 कप चहा पितात. पण फीट राहण्यासाठी चहा टाळण्याचा सल्ला दिला जातो. कारण दुधासोबत चहा प्यायल्याने वजन वाढतं असं म्हणतात.
मात्र चहा प्यायल्याने खरंच वजन वाढतं का याबाबत वस्तुस्थिती काय आहे हे कोणालाच माहीत नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही कारण याचं उत्तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
चहामुळे हे वजन वाढणं हे त्यामध्ये वापरल्या जाणार्या घटकांवर अवलंबून असतं. चहा बनवताना दूध आणि साखरेचा वापर केला जातो. कारण चहा शिवाय अपूर्ण आहे. पण हे दोन्ही घटक वजन वाढवण्यास कारणीभूत ठरतात.
दुसरीकडे, जर तुम्ही हाय फॅट दुधाचा चहा प्यायला तर त्यामुळे शरीरातील चरबी आणि वजनही वाढतं. याउलट, जर तुम्ही सामान्य दुधाच्या चहामध्ये अर्धा चमचा साखर मिसळून चहा प्यायला तर तुमचं वजन वर्षाला एक किलोने वाढू शकतं. शिवाय जर तुम्ही दररोज 2 ते 3 कमी चहा प्यायलात तर तुमचं वजन वाढण्याची दाट शक्यता आहे.