दातांच्या समस्येने देखील कर्करोग होण्याची शक्यता

देशातील कित्येक लोकांना दात स्वच्छ साफ न केल्यामुळे तोंडाचा कर्करोग (कॅंन्सर) झाल्याचे समोर आले आहे.

Updated: May 14, 2019, 10:38 PM IST
दातांच्या समस्येने देखील कर्करोग होण्याची शक्यता title=

मुंबई : कर्करोग (कॅंन्सर) होण्याचे नवे कारण सध्या समोर आले आहे. देशातील कित्येक लोकांना दात स्वच्छ साफ न केल्यामुळे तोंडाचा कर्करोग (कॅंन्सर) झाल्याचे समोर आले आहे. अशी दिरंगाई करणाऱ्या लोकांच्या संख्येत ४ ते ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जे लोक कोणत्याही प्रकारच्या तंबाखूचे सेवन करत नाहीत, त्यांना सुद्धा कर्करोग (कॅंन्सर) होण्याची शक्यता आहे. तुटलेल्या दातांच्या फटी योग्यरित्या साफ न केल्यामुळे हा गंभीर त्रास उद्भवण्याची शक्यता आहे. अन्नाचे कण दातांमध्ये अडकतात आणि त्यानंतर ते कण कुजतात. कुजलेल्या कणांमुळे सुद्धा कर्करोग होवू शकतो. 

मगील सहा वर्षांमध्ये भारत देशात ओठ आणि तोंडाचे कर्करोग असणाऱ्या रूग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. या परिस्थितीला रोखण्यासाठी खराब दातांची स्वच्छता, तुटलेले दात याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.

काही उपाय
- ताबाखू खाणे टाळा. जर तंबाखू खात असाल तर वेळीच खाणे बंद करा. 

- मद्याचे सेवन प्रमाणात करा.

- उन्हामध्ये फार काळ राहणे टाळा. उन्हात जाण्याआधी लिपबामचा वापर करा.

- फास्ट फूड खाणे टाळा किंवा प्रमाणात खा. आहात ताज्या फळांचा वापर करा. 

- सतत तंबाखूची तलफ येत असल्यास, पायऱ्यांवरून चढ-उतार करा.