मुंबई : आताच्या धावपळीच्या जीवनात बहुतेक लोक स्वतःला वेळ देऊ शकत नाहीत. अनियमित आहार आणि व्यस्त जीवनशैलीचा पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो. जे लोक जास्त फास्ट फूड खातात, त्यांना बद्धकोष्ठतेचा धोका जास्त असतो. पुरेशी झोप न मिळणे आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळेही बद्धकोष्ठता आणि आम्लपित्ताचा त्रास होत असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पोटाशी संबंधित या समस्यांची वेळीच काळजी घेतली नाही तर ते गंभीर आजाराचे रूप घेतात.
आयुर्वेद तज्ञ काय म्हणतात
देशातील प्रसिद्ध आयुर्वेद डॉक्टर अबरार मुलतानी सांगतात की, नियमित योगासने आणि सकस आहारामुळे आम्लपित्त आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका मिळू शकते. अशी काही फळे आहेत, जी बद्धकोष्ठतेवर फायदेशीर आहेत. त्यांच्या नियमित सेवनाने बद्धकोष्ठता आणि अपचनाच्या समस्येवर मात करता येते.
आहारात तंतुमय अन्नाचा अभाव.
मैद्यापासून बनवलेले तळलेले तिखट-मसालेदार पदार्थ खाणे.
कमी पाणी पिणे किंवा द्रवपदार्थाचे सेवन कमी करणे.
वेळेवर न खाणे.
रात्री उशिरा जेवणे.
चहा, कॉफी, तंबाखू किंवा सिगारेट इत्यादींचे जास्त प्रमाणात सेवन करणे.
बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी ही फळे गुणकारी
1. पपई
पपई बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. त्यात व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, कॅल्शियम, फोलेट, व्हिटॅमिन ई आणि सी आणि बीटा-कॅरोटीन लक्षणीय प्रमाणात असतात. पपई नियमित खाल्ल्याने आतडे व्यवस्थित साफ होतात, त्यामुळे बद्धकोष्ठता होत नाही.
2. सफरचंद
सफरचंदात असलेले सॉर्बिटॉल तत्व बद्धकोष्ठता दूर करते आणि पोट चांगले साफ करते. एक सफरचंद नियमितपणे सकाळी रिकाम्या पोटी खावे.
3. द्राक्षे
बद्धकोष्ठता दूर करण्यासाठीही द्राक्षे गुणकारी आहेत. यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी तसेच पोटॅशियम आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते. याशिवाय द्राक्षांमध्ये फ्लेव्होनॉइड्ससारखे अँटीऑक्सिडंट घटकही जास्त प्रमाणात असतात. द्राक्षांचे नियमित सेवन केल्याने पचनक्रिया चांगली राहते.
4. नाशपती
उन्हाळ्यात मिळणारे नाशपती आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. नाशपतीचे पेक्टिन तत्व पोट साफ करण्यास मदत करते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही नाशपतीचा रस देखील घेऊ शकता.
येथे प्रदान केलेली माहिती कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. ते केवळ शिक्षणाच्या उद्देशाने दिले आहे.