मुंबई : पुरुषांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. विशेषत: ज्या ठिकाणी वायू प्रदूषण खूप जास्त आहे. वायू प्रदूषणामुळे तुम्हाला अनेक आजार तर होऊ शकतात मात्र पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्याही कमी होऊ शकते. युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड स्कूल ऑफ मेडिसिन (यूएमएसओएम) च्या संशोधकांनी त्यांच्या संशोधनात असे आढळून आलं आहे.
वायु प्रदूषणाचा मेंदूमध्ये सूज निर्माण होऊन शुक्राणूंच्या संख्येवर कसा परिणाम होतो, हे या संशोधनानुसार समोर आणण्यात आलं आहे. हे संशोधन जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे. दरम्यान गरम हवेचा शुक्राणूंवर परिणाम होत असल्याचे यापूर्वीच समोर आलं आहे.
प्रदूषित हवेत श्वास घेणं पुरुषांसाठी धोकादायक ठरू शकतं. हे पुरुषांची प्रजनन क्षमता (मुलांना जन्म देण्याची क्षमता) देखील कमी करू शकतं. तणावपूर्ण परिस्थितीत, मेंदूचा सेक्स ऑर्गन्सशी थेट संबंध असतो, ज्यामुळे जननक्षमता आणि शुक्राणूंची संख्या प्रभावित होते. वायुप्रदूषणाचा मेंदूवर परिणाम होतो, त्याचा परिणाम शुक्राणूंवर होतो.
आघाडीचे संशोधक आणि UMSOM मधील औषधाचे सहाय्यक प्राध्यापक, झेकांग यिंग म्हणाले की, प्रजनन क्षमतेवर प्रदूषणाच्या परिणामावरही उपचार मिळू शकतात का यावर आम्ही संशोधन करत आहोत.
चार्ल्स हाँग, मेडिसिनचे एमडी प्रोफेसर आणि UMSOM चे कार्डिओलॉजी रिसर्चचे संचालक म्हणतात की, "वायू प्रदूषणामुळे मधुमेह, रक्तदाब, हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतात. प्रदूषणामुळे मेंदूला सूज येण्याची शक्यता असते. ज्याचा प्रजनन क्षमतेवर मोठा परिणाम होतो.
संशोधन असं सूचित करतं की, जगातील सुमारे 92 टक्के लोकसंख्या अशा भागात राहते जिथे हवेतील सूक्ष्म कणांची पातळी 2.5 कणांपेक्षा कमी आहे. हे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) निश्चित केलेल्या किमान सुरक्षा मानकांपेक्षा जास्त आहे. 2.5 सारखे सूक्ष्म कण हेच नुकसान करतात.