मुंबई : प्रत्येक जण स्वतःची काळजी योग्य रीतीने घेत असतात. पण असं असताना देखील मानेवर काही प्रामाणात काळे डाग राहतात. त्यासाठी आपण प्रत्येक जण महागड्या प्रॉडक्टचा वापर करतो. या प्रॉडक्टमध्ये रसायने असल्यामुळे त्याचा विपरित परिणाम आपल्या त्वचेवर होतो. पण या समस्येवर घरगुती उपाय केले तर त्याचा आपल्या त्वचेवर काही वाईट परिणाम होत नाही. पण कोणताही उपाय करण्यारपूर्वी डॉक्टरांचा नक्की सल्ला घ्या...
1. बदामचं तेल : मानेवरचा काळेपणा दूर करण्यासाठी बदामाच्या तेलाचे काही थेंब घ्या आणि मानेवर चोळा. तेलाला शरीरावर कोरडं होवू द्या. बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ई आणि ब्लीचिंगचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मानेवरील त्वचा उजळते.
2. एलोवेरा जेल : एलोवेरा जेल मानेवरील काळेपणा दूर करू शकतो. एलोवेरामध्ये व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात. सर्व प्रथम एलोवेराचं गर काढा आणि तो मानेला लावा. साधारण अर्धा तास जेल मानेवर राहू द्या. त्यानंतर मान स्वच्छ पाण्याने धुवा.
3. दही : सर्वप्रथम दही घ्या आणि मानेवर लावा. दह्याला 15 मिनिटं मानेवर तसचं ठेवा. त्यानंतर मान स्वच्छ पाण्याने धुवा. या उपायामुळे मानेवरील त्वचा उजळते.
डायबेटीसची सुरूवात तर नाही ना?
यात आणखी एक महत्वाची बाब म्हणजे, घरगुती उपाय केल्यावरही काळा डाग निघत नसेल, तर डॉक्टरांना भेटा, अनेक वेळा डायबेटीसची सुरूवात असताना मान काळी पडण्यास सुरूवात होते, तेव्हा रक्ताची चाचणी करून घेणे देखील फायदेशीर असते.