मुंबई : वाढता लठ्ठपणा कोणालाही आवडत नाही. लठ्ठपणा शरीराला आळशी तसंच मानसिकदृष्ट्याही परिणाम करतो. शरीरात साठलेलं फॅट कमी करणं हे फार कठीण काम आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी लोकं वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करतात. लठ्ठपणाचा सर्वात मोठा परिणाम पोटावर दिसून येतो. बेली फॅटमुळे शरीराची ठेवणंही बदलते आणि अनेक शारीरिक समस्यांनाही तोंड द्यावं लागतं.
तुम्हालाही शरीर तुमचं शरीर फीट ठेवायचं असेल आणि पोटावरील फॅटवर नियंत्रण ठेवायचं असेल तर आहारात फळं आणि भाज्यांच्या रसांचा समावेश करा. फळांच्या आणि भाज्यांच्या रसांमध्ये विविध खनिजं, जीवनसत्त्वं, फायबर आणि अँटिऑक्सिडंट असतात, जे मेटाबॉलिझ्म वाढवतात आणि कॅलरी बर्न करतात.
बेली फॅट कमी करण्यासाठी कारल्याचा रस प्या. कारल्याचा रस कडू असला तरी वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारल्याचा रस नियमितपणे प्यायल्याने यकृतामधून पित्त एसिडचा स्राव होतो जो चयापचय क्रियेसाठी आवश्यक असतं. शिवाय, कारल्यात कॅलरीज खूप कमी असतात. 100 ग्रॅम कारल्यामध्ये फक्त 17 कॅलरीज असतात. कारल्याचा रस वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम रस आहे.
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी काकडीचा रस फायदेशीर आहे. काकडीत पाण्याचं प्रमाण जास्त आणि कॅलरीज कमी असतात. काकडीमध्ये भरपूर पाणी आणि फायबर असतं, ज्यामुळे तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटतं. उन्हाळ्यात या रसाची चव वाढवण्यासाठी तुम्ही लिंबू आणि पुदिन्याच्या पानांचंही सेवन करू शकता.
डाळिंब्याचा रस केवळ चवीलाच चांगला नाही तर वजन कमी करण्यातही तो गुणकारी आहे. डाळिंबाच्या रसामध्ये अँटिऑक्सिडंट्स, पॉलिफेनॉल्स भरपूर असतात जे फॅट बर्न करण्यासाठी मदत करतात. डाळिंबाचा रस त्वचेसाठीही उपयुक्त आहे.