मुंबई : सौंदर्य ही महिलांच्या जिव्हाळ्याची बाब. प्रत्येक महिलेला आपण सुंदर दिसावे, असे वाटते. त्यात काही गैर नाही. त्यासाठी अनेकजणी आपआपल्या परिने प्रयत्न करताना दिसतात. मेकअपचा आधार घेतात. मात्र सौंदर्याचे आकर्षण वय वाढले तरी संपत नाही. वाढते वय चेहऱ्यावर दिसू नये यासाठी सगळ्याजणी काही ना काही उपाययोजना करताना दिसतात. तुमच्या या प्रयत्नात या टिप्स तुम्हाला नक्कीच मदत करतील. म्हणून तारुण्य टिकवण्यासाठी आतापासूनच या टिप्सचा अवलंब करा...
#1. कितीही उशीर झाली तरी रात्री झोपण्यापूर्वी मेकअप काढा. रात्रभर मेकअप चेहऱ्यावर राहिल्याने त्वचा खराब होईल. झोपताना त्वचेचे पोर्स ओपन होतात त्यामुळे मेकअप आतपर्यंत जावून पिंपल्स येण्याची संभावना असते.
#2. हात सुंदर राहण्यासाठी हॅंडक्रिम लावा. त्यापूर्वी हात सौम्य साबणाने स्वच्छ धुवून घ्या.
#3. केस बांधून झोपा. केस मोकळे सोडल्याने तुटण्याची, गळण्याची आणि खराब होण्याची शक्यता अधिक असते.
#4. फाटलेल्या टाचांवर उत्तम उपाय म्हणजे झोपण्यापूर्वी पाय स्वच्छ धुवा आणि त्यावर पेट्रोलियम जेल लावा.
#5. रात्री झोपण्यापूर्वी दात घासा.
#6. उशीचे कव्हर स्वच्छ असावे अन्यथा चेहऱ्याच्या त्वचेचे नुकसान होईल.
#7. सौंदर्य आणि आरोग्याचा विचार केल्यास शांत झोपेची नितांत आवश्यकता आहे.
#8. चमकदार चेहऱ्यासाठी झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करा. नंतर टोनर आणि आयक्रिम लावा. सकाळी उठल्यावर चेहरा चमकदार दिसू लागेल.