मुंबई : कोरोना व्हायरसचा धोका आता कुठे कमी होताना दिसत असताना केरळमध्ये अजून एका संसर्गाने धुमाकूळ घातला आहे. या ठिकाणी सध्या टोमॅटो फीवरने थैमान घातलं आहे. मुख्य म्हणजे याचा धोका लहान मुलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतोय. आतापर्यंत राज्यातील 82 लहानग्यांना टोमॅटो फीवरची लागण झाली आहे. दरम्यान या संसर्गाचं मुख्य कारण अजूनही समोर आलं नाहीये.
टोमॅटो फीवरचा संसर्ग झालेले ही 82 मुलं कोल्लम शहरातील आहेत. स्थानिक मिडीयाच्या रिपोर्टनुसार, सध्या सर्व आजारी मुलांवर सरकारी रूग्णालयात उपचार सुरु आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने परिस्थितीवर गांभिर्याने नजर ठेवली आहे.
टोमेटो फीवरला टोमेटो फ्लू असंही म्हटलं जातं. हे एक व्हायरल इन्फेक्शन असून 5 वर्षांच्या खालील बालकांना याचा संसर्ग होतो. ज्या बालकांना याचा संसर्ग झाला आहे त्यांना रॅसेज, डिहायड्रेशन, त्वचेला खाज येणं किंवा त्वचेवर फोड येणं यांच्यासारखी लक्षणं दिसून येत आहेत.
या व्हायरल इन्फेक्शनचं नाव टोमेटो प्लू ठेवण्यात आलंय कारण, यामुळे त्वचेवर येणारे फोड हे सामान्यतः गोल आणि लाल रंगाचे आहेत.