मासिक पाळीत वाढतंय वजन? असं करा Control

पिरीयड्स दरम्यान तीन ते पाच पाऊंड इतकं वजन वाढणं ही सामान्य गोष्ट आहे. 

Updated: Feb 11, 2022, 03:47 PM IST
मासिक पाळीत वाढतंय वजन? असं करा Control title=

मुंबई : मासिक पाळीदरम्यान तुम्हालाही वाटतं का की तुमचं वजन वाढलंय...तुम्हाला जर असं वाटतं असेल तर घाबरू नका हा तुमचा भ्रम नाहीये. कारण पिरीयड्स दरम्यान तीन ते पाच पाऊंड इतकं वजन वाढणं ही सामान्य गोष्ट आहे. मुख्य म्हणजे मासिक पाळीचे दिवस संपले की, वजन पूर्ववत होण्यास मदत होते. 

पिरीयड्समध्ये वजन वाढण्याचं कारण

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये हार्मोन्सच्या असंतुलनामुळे वजन वाजनात वाढ होते. जवळपास 90 टक्के महिलांमध्ये ही समस्या दिसून येते. 

या उपायांनी पिरीयड्समध्ये वाढलेलं वजन नियंत्रणात आणू शकता

भरपूर पाणी प्या

हायड्रेटेड राहिल्याने वॉटर रिटेंशन कमी होऊ शकतं. जर तुमच्या शरीरात पाण्याची कमी असेल तर तुमचं शरीर अधिक द्रवपदार्थांचं संरक्षण वाचवेल. ज्यामुळे तुम्ही जाड दिसू शकता.

हेल्दी डाएट घ्या

अधिक हेल्दी पदार्थ खाण्यावर भर द्या. तरीही तुम्‍हाला क्रेविंग होत असेल असल्‍यास, पोषक पदार्थ खाण्याचा पर्याय ठेवा. जर तुम्हाला काहीही गोड खाण्याची इच्छा झाली तर फळ किंवा प्रोटीन बारसारखे पदार्थ खाऊ शकता.

व्यायाम करा

व्यायाम करण्यात खंड पडू देऊ नका. नियमितपणे एरोबिक पद्धतीचा व्यायाम केल्याने पिरीयड्सदरम्यान वजन वाढण्याची समस्या कमी होऊ शकते. यासाठी दररोज 30 मिनिटं व्यायाम केला पाहिजे.

साखर आणि कॅफेनचं प्रमाण कमी करा

मासिक पाळीदरम्यान वजन वाढत असेल तर आहारात साखर किंव गोडाचं प्रमाण कमी करावं. यामुळे पोटफुगीचाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे मासिक पाळी येण्याअगोदरही या पदार्थांचं सेवन करू नये.