मुंबई : आपल्या सर्वांना हे माहित आहे की, निरोगी राहण्यासाठी, चांगल्या गोष्टी खाण्यापिण्यासोबतच भरपूर झोप घेणे देखील आवश्यक आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? की रात्री चांगली झोप न लागल्यामुळे देखील तुमचे वजन वाढू शकते? झोप पूर्ण न झाल्यामुळे आपण चिडचिडे होतो. याशिवाय बरेच लोकं जास्त खातात जेणे करुन त्यांचे मन शांत राहते. परंतु यामुळे शरीरात जास्त कॅलरी जमा होते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, झोप तुमच्या आरोग्यासाठी किती महत्वाची आहे, आणि झोप पूर्ण न झाल्याने वजन कसे वाढते.
रात्री 7 ते 8 तासांच्या झोपेमुळे आपले चयापचय चांगले कार्य करते आणि वजन कमी करण्यास मदत करते. परंतु रात्री चांगली झोप न घेतल्यामुळे चयापचय क्रियेला आपले काम करण्यास अडथळा येतो. यामुळे तुम्हाला भूक देखील जास्त लागते.
भूक लागण्या मागे दोन हार्मोन्स आहेत. एक म्हणजे गॅरलीन आणि दुसरे लॅपटीन. जेव्हा आपण पुरेशी झोप घेत नाही, तेव्हा शरीरात या हार्मोन्सचे प्रमाण वाढते. म्हणूनच आपण आवश्यकतेपेक्षा जास्त आहार घेणे सुरू करतो. ज्यामुळे आपले शरीर जाड होते.
2016 च्या अभ्यासानुसार, जे लोक रात्री चांगली झोप घेत नाहीत. ते लोकं दुसर्या दिवशी जास्त अन्न खातात. सामान्य माणसाने 385 कॅलरी खाल्ल्या पाहिजेत. या अभ्यासामध्ये असेही म्हटले गेले होते की, कमी झोपेमुळे आपण अन्नात जास्त चरबी वाले पदार्थ खातो.
कारण झोप पूर्ण न झाल्याने आपल्याला जंक फूड खायची इच्छा होते. तसेच झोपेच्या कमतरतेमुळे कॅलरी देखील कमी प्रमाणात बर्न होतात. जे आपल्या शरीरातील चयापचय दर कमी करतात.
एका अभ्यासानुसार, दररोज 385 कॅलरी खाल्ल्याने 9 दिवसात 500 ग्रॅम वजनाची वाढ होते. याशिवाय टाईप -२ मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोग होऊ शकतात. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर पुरेशी झोप घ्या.
दररोज वेळेवर झोपा आणि वेळेवर उठा. झोपेच्या 2 तास आधी अन्न खा आणि जर तुम्हाला झोप येत नसेल तर, स्ट्रेचिंग व्यायाम आणि घरगुती उपचारांचा अवलंब करू शकता.