मुंबई : मनुका शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. पण कोणता मनुका आरोग्यासाठी अधिक चांगले असतात. हे तुम्हाला माहित आहे का. कारण बाजारात अनेक प्रकारचे मनुके विकायला असतात. काळे, हिरवे, लाल आणि पिवळे मनुके सहज मिळतील. हे सर्व मनुके आरोग्यासाठी चांगले आहेत, परंतु आज आम्ही तुम्हाला सर्वात फायदेशीर मनुके कोणते आहेत ते सांगणार आहोत.
डायफ्रुट्स खरेदी करताना कोणत्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स खरेदी करावे याची माहिती असायला हवी. तसेच मनुके खरेदी करतानाही असते. विविध प्रकारची द्राक्षे आणि बेरी सुकवून मनुका तयार केला जातो.
मनुक्यामध्ये प्रथिने, लोह आणि फायबर मुबलक प्रमाणात असतात. ज्यामध्ये व्हिटॅमिन बी 6, कॅल्शियम, पोटॅशियम देखील असतात. शिवाय अँटिऑक्सिडेंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म देखील असतात. ते व्हिटॅमिन ई आणि निरोगी चरबीचे स्त्रोत देखील आहेत.
सर्व मनुक्याचे त्यांचे स्वतःचे विशेष गुणधर्म आहेत. तुम्ही तुमच्या आहारात जे काही चांगले चवीचे असेल ते समाविष्ट करू शकता, परंतु सुलताना मनुका, ज्याला सोनेरी मनुका असेही म्हणतात, तुमच्या आरोग्यासाठी चांगले आहेत. त्यात फायबर, पोटॅशियम, लोह अशी अनेक खनिजे आढळतात.
तुम्ही त्यांचा आहारात नक्कीच समावेश केला पाहिजे. मात्र, तुम्ही मनुका जास्त प्रमाणात खाणे टाळावे, कारण मनुके खूप गोड असतात, ज्यामुळे वजन वाढू शकते. मनुका खाण्याचा योग्य मार्ग म्हणजे रात्री भिजवून ठेवणे आणि सकाळी रिकाम्या पोटी खाणे.