मुंबई : रोजची जीवनशैली तसेच डाएटचा परिणाम आपल्या बॉ़डी शेपवर होत असतो. प्रत्येकी जीवनशैली आणि डाएट वेगवेगळे असल्याने बॉडी शेपही वेगवेगळे असतात. याचा आपल्या आरोग्यावरही परिणाम होतो. तुम्ही एखाद्याच्या बॉडी शेपवरुन त्याच्या फिटनेसचा अंदाज लावू शकता. साधारणपणे चार प्रकारच्या बॉडी शेप असलेल्या व्यक्ती असतात. जाणून घ्या बॉडीशेपनुसार आरोग्याच्या गोष्टी....
अॅपल शेप - जर तुमची बॉडी शरीराच्या मधोमध म्हणजेच पोट आणि कमरेजवळ अधिक फॅटी आहे तर तुमच्या बॉडीचा शेप अॅपलसारखा आहे. अॅपल शेप असणाऱ्या व्यक्तींचा खांदा कमरेच्या तुलनेत अधिक रुंद असतो.
आजार - असा शेप असणाऱ्या व्यक्तींच्या शरीरातील वरच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात फॅट जमा झाल्याने यांना ब्लड प्रेशर तसेच हृद्याशी संबंधित आजारांचा धोका असू शकतो.
पिअर्स शेप - या शेपमधील व्यक्ती मोठ्या प्रमाणात फॅटी असतात. यांच्या कमरेचा भाग अधिक रुंद असतो. त्यामुळे शरीराचा आकार नासपतीसारखा दिसतो.
आजार - या व्यक्तींचे वजन अधिक असल्याने पायांवर अधिक ताण येतो. यामुळे यांना सांधेदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात.
अवरग्लास शेप - या व्यक्तींच्या खांदा आणि मांड्यांकडील भाग अधिक रुंद असतो. त्याच्या तुलनेत कमरेकडचा भाग बारीक असतो.
आजार - या व्यक्तींनाही ब्लड प्रेशर, डायबिटीज तसेच हृदयाशी संबंधित आजारांचा धोका असतो.
ट्रँगल शेप - अशा व्यक्तींचा खांद्याकडील भाग अधिक रुंद असतो आणि त्यानंतर निमुळता होत जातो.
आजार - या व्यक्तींच्या शरीराच्या खालच्या भागात फॅट कमी जमा होत असल्याने यांना आजारांचा धोका कमी असतो.