कोलकाता : नर्सरीमधील एका चार वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
कोलकातामधील एका प्रायव्हेट शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेनंतर संतप्त पालकांनी शाळेसमोर निदर्शने केली त्यानंतर पोलिसांनी दोन शिक्षकांना अटक केली.
पोलीस आयुक्त विशाल गर्ग यांनी माहिती दिली की, या प्रकरणी शारीरिक प्रशिक्षण (पीटी) शिक्षकांना अटक केली आहे. तसेच त्यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे.
कोलकाता पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी गुरुवारी शाळेतून घरी गेली आणि त्यानंतर रडत होती. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने कपड्यांवर लागलेलं रक्त पाहिलं. यानंतर पीडित मुलीने आपल्यासोबत झालेल्या घटनेसंदर्भात आईला सांगितलं. पीटीच्या शिक्षक चिमुकलीला टॉयलेटमध्ये घेऊन गेले आणि त्यानंतर तिच्यासोबत गैरकृत्य केलं.
पीडित मुलीसोबत तिच्या आई-वडीलांनी पोलीस स्टेशन गाठलं. त्यानंतर पोलिसांनी एसएसकेएम रुग्णालयात पीडित मुलीला दाखल करुन तिची तपासणी केली. तपासणीत लैंगिक छळ झाल्याचं उघड झालं.