मुंबई : 500 Rupees Fake Note Update : सध्या सोशल मीडियावर एक मेसेज खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये 500 च्या दोन नोटांमधील फरक सांगितला जात आहे. तुम्हालाही असा मेसेज आला असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
संबधित मॅसेजमध्ये हिरव्या रंगाची तुटक पट्टी गवर्नरच्या सहीवर असल्यास ती नोट खोटी आहे असं म्हटलंय. पीआयबी फॅक्ट, चेकनुसार हा मेसेज पूर्णपणे खोटा आहे. दोन्ही प्रकारच्या नोटा पूर्णपणे वैध आहेत. त्यामुळे याबाबतीत कोणत्याही संभ्रमात राहू नका. पीआयबी फॅक्ट चेकने त्याच्या सोशल अकाउंटवर त्याच्याशी संबंधित लिंक देखील शेअर केली आहे. ज्यामध्ये आरबीआयने संबंधित माहिती दिली आहे.
RBI ने पैसे बोलता है या साईटवर ही 500 ची नोट ओळखण्यासाठी 17 मुद्दे दिले आहेत https://paisaboltahai.rbi.org.in/pdf/Rs500%20Currency%20Note_Eng_05022019.pdf. या मुद्द्यांच्या मदतीने तुम्ही 500 ची नोट सहज ओळखू शकाल.
1. नोट उजेडासमोर ठेवल्यास या ठिकाणी 500 लिहिलेले दिसतील.
2. 45 अंशाच्या कोनातून नोट डोळ्यासमोर ठेवल्यास या ठिकाणी 500 लिहिलेले दिसेल.
3. या ठिकाणी देवनागरीत 500 लिहिलेले दिसेल.
4. महात्मा गांधींचे चित्र अगदी मध्यभागी आहे.
5. भारत आणि India ही अक्षरे लिहिलेली दिसतील.
6. जर तुम्ही नोट थोडी दुमडली तर सिक्युरिटी थ्रेडचा रंग हिरव्यापासून इंडिगोमध्ये बदलताना दिसेल.
7. जुन्या नोटेच्या तुलनेत गव्हर्नरची स्वाक्षरी, गारंटी क्लॉज, प्रॉमिस क्लॉज आणि RBI लोगो उजव्या बाजूला सरकले आहेत.
8. येथे महात्मा गांधींचे चित्र आहे आणि इलेक्ट्रोटाइप वॉटरमार्क देखील दिसेल.
9. वरच्या बाजूला डावी बाजू आणि तळाशी उजवीकडे संख्या डावीकडून उजवीकडे मोठी होते.
10. येथे लिहिलेल्या 500 क्रमांकाचा रंग बदलतो. त्याचा रंग हिरव्यापासून निळ्यामध्ये बदलतो.
11. उजवीकडे अशोक स्तंभ आहे.
12. उजव्या बाजूला 500 लिहिलेले वर्तुळ बॉक्स, उजव्या आणि डाव्या बाजूला 5 ब्लीड रेषा आणि अशोक स्तंभाचे प्रतीक, रफल प्रिंटमध्ये महात्मा गांधींचे चित्र.
13. नोट छापण्याचे वर्ष लिहिलेले असते.
14. स्वच्छ भारतचा लोगो घोषवाक्यासह छापलेला आहे.
15. मध्यभागी एक भाषा फलक आहे.
16. भारतीय ध्वजासह लाल किल्ल्याचे चित्र छापलेले आहे.
17. देवनागरीमध्ये 500 प्रिंट्स आहेत.
यातील 12वा मुद्दा देखील अंध लोकांसाठी बनवण्यात आली आहे. अंध लोकांना नोट ओळखणे सोपे होते. यामध्ये अशोकस्तंभाचे बोधचिन्ह, महात्मा गांधींचे चित्र, ब्लीड लाईन आणि ओळखचिन्ह अशी रफली छापण्यात आली आहे.