इस्लामाबाद: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या इस्लामाबाद येथील कार्यालयात सोमवारी आग लागल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, कार्यालयाच्या सहाव्या मजल्यावर ही आग लागली. आग लागली तेव्हा इम्रान खान पाचव्या मजल्यावर होते. मात्र, आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने इमारतीबाहेर नेण्यात आले. यानंतर इम्रान खान बानी गाला येथील निवासस्थानी रवाना झाले.
Pakistan media: A fire broke out on the sixth floor of the Prime Minister Secretariat. Prime Minister #ImranKhan was reportedly present on the fifth floor of the secretariat when the fire broke out (file pic) pic.twitter.com/wF03JLIput
— ANI (@ANI) April 8, 2019
जिओ टीव्हीच्या माहितीनुसार, इस्लामाबाद येथील पंतप्रधान सचिवालयाच्या सहाव्या मजल्यावर हा प्रकार घडला. त्यावेळी इम्रान खान पाचव्या मजल्यावर काही अधिकाऱ्यांसोबत बैठकीत व्यग्र होते. बराच वेळ आग लागल्याचे अनेकांच्या लक्षात आले नाही. अखेर काही सुरक्षा अधिकाऱ्यांनी इम्रान खान यांनी आग लागल्याचे सांगितले. तेव्हा इम्रान खान यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना इमारतीमधून बाहेर काढण्यात आले.