Crime News: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) देवरिया येथील भाटपाररानी रेल्वे स्थानकावर एका तरुणीवर लैंगिक अत्याचार (Rape) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीहून बिहारला जाणारी तरुणी रक्ताने माखलेल्या अवस्थेत सापडल्यानंतर खळबळ उडाली होती. तरुणीला मेडिकल कॉलेजात भरती करण्यात आलं आहे. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तिची प्रकृती जास्त बिघडली होती. डॉक्टरांच्या टीमने तरुणीच्या गुप्तांगाजवळ सर्जरी करत तिला रक्तपुरवठा केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आपल्या प्रियकरासह दिल्लीहून बिहारला निघाली होती. दरम्यान यावेळी भांडण झाल्याने ती ट्रेनमधून खाली उतरली. यानंतर भाटपाररानी रेल्वे स्थानकावर तरुणी दुसऱ्या ट्रेनची वाट पाहत उभी होती. यावेळी तिथेच राहणाऱ्या दोन तरुणांनी तिला आपल्या जाळ्यात ओढलं आणि लैंगिक अत्याचार केला. तरुणीला उपचारासाठी मेडिकल कॉलेजात दाखल करण्यात आलं आहे.
मेडिकल कॉलेजच्या आतमध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वत: तिथे उपस्थित आहेत. कोणालाही तरुणीला भेटू दिलं जात नाही आहे. पोलिसांनी आरोप दीपक जयस्वाल आणि रोहित गोंड यांना बेड्या ठोकल्या आहेत.
19/20 फेब्रुवारीच्या रात्री दिल्लीहून बिहारला जाणारी तरुणी भाटपाररानी रेल्वे स्थानकावर उतरली होती. येथे दोन तरुणांनी तिच्यावर बलात्कार केला आणि बेशुद्ध अवस्थेत सोडून पळून गेले. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने तरुणी रेल्वे स्थानकावरील बेंचवर झोपली होती. स्टेशन मास्तराने पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर तिला रुग्णालयात घेऊन गेले. मेडिकल कॉलेजात असताना पोलिसांनी फोटो दाखवले असता पीडितेने लगेचच आरोपींची ओळख पटवली. यानंतर पोलिसांनी तात्काळ दोघांनाही बेड्या ठोकल्या.
पीडित तरुणी मुळची बिहारच्या बगहा जिल्ह्याची आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती दिल्लीत राहत आहे. रविवारी ती आपल्या प्रियकरासह दिल्लीहून बिहारला जात असताना भांडण झालं होतं. तरुणी पुन्हा गोरखपूरला जाण्याची ट्रेन वाट पाहत असतानाच ही घटना घडली.