बायको भिकाऱ्यासह गेली पळून, 6 मुलांना सोडलं वाऱ्यावर; पतीने गाठलं पोलीस स्टेशन, म्हणाला 'ती रोज...'; पोलीस चक्रावले

पतीने पोलीस तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, नन्हे पंडित नेहमी फोनवरुन राजेश्वरीशी मेसेजवरुन संवाद साधत असे. याशिवाय त्यांचं फोनवरही बोलणं व्हायचं.   

शिवराज यादव | Updated: Jan 7, 2025, 03:07 PM IST
बायको भिकाऱ्यासह गेली पळून, 6 मुलांना सोडलं वाऱ्यावर; पतीने गाठलं पोलीस स्टेशन, म्हणाला 'ती रोज...'; पोलीस चक्रावले title=

Uttar Pradesh Viral News: उत्तर प्रदेशात एक महिला आपला पती आणि सहा मुलांना सोडून पळून गेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एका भिकाऱ्यासह ती पळून गेली आहे. यानंतर पती राजू याने पोलीस ठाण्यात कलम 87 अंतर्गत अपहरणाची तक्रार दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, याप्रकरणी आरोपीचा शोध घेतला जात आहे. 

तक्रारीत महिलेचा 45 वर्षीय पती राजूने म्हटलं आहे की, आपली पत्नी राजेश्वरी आणि सहा मुलांसह तो हरदोईच्या हरपालपूर परिसरात राहतो. त्याने सांगितलं आहे की, नन्हे पंडित शेजारी कधीतरी भीक मागण्यासाठी येत असे. यावेळी नन्हे पंडित राजेश्वरीशी फोनवरुन गप्पा मारत असे असा दावा पतीने केला आहे. 

"3 जानेवारीला दुपारी 2 च्या सुमारास माझी पत्नी राजेश्वरी हिने आमची मुलगी खुशबू हिला सांगितलं की, ती कपडे आणि भाजी घेण्यासाठी बाजारात जात आहे. ती परत न आल्याने मी तिला सगळीकडे शोधले, पण ती सापडली नाही. माझी पत्नी घरातून निघून गेली. मी म्हैस विकून कमावलेल्या पैशातून नन्हे पंडितने तिला सोबत नेले असा संशय आहे,' असं राजूने तक्रारीत म्हटलं आहे. पोलिसांनी आम्ही नन्हे पंडितचा शोध घेत आहोत 

भारतीय न्याय संहितेच्या कलम 87 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. "जो कोणी स्त्रीचं अपहरण अपहरण करतो किंवा बळजबरी करतो, किंवा तिच्या इच्छेविरुद्ध कोणत्याही व्यक्तीशी लग्न करावे, किंवा तिला जबरदस्तीने किंवा बेकायदेशीर संभोग करण्यास प्रवृत्त केले जाईल, किंवा तिला बेकायदेशीर संभोग करण्यास भाग पाडले जाईल किंवा फूस लावली जाईल अशी शक्यता जाणून घेतल्यास, त्याला कारावासाची शिक्षा दिली जाईल जी दहा वर्षांपर्यंत वाढू शकते आणि दंडही ठोठावला जाऊ शकतो," असं कायदा सांगतो

तसंच जो कोणी, या संहितेत परिभाषित केल्याप्रमाणे गुन्हेगारी धाक दाखवून किंवा अधिकाराचा गैरवापर करून किंवा बळजबरी करण्याच्या इतर कोणत्याही पद्धतीद्वारे, कोणत्याही स्त्रीला कोणत्याही ठिकाणाहून जाण्यास प्रवृत्त करते, तिला दुसऱ्या व्यक्तीशी बेकायदेशीर संभोग करण्यासाठी बळजबरी किंवा फूस लावली जाण्याची शक्यता आहे, ती देखील शिक्षेस पात्र आहे.