मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांनी मोठी घोषणा केली आहे. गुजरातमध्ये पुढील वर्षात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीत आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party) सर्व जागा लढवणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री केजरीवालांनी केली. केजरीवाल आज सोमवारी एकदिवसीय गुजरात दौऱ्यावर होते. (Aam Aadmi Party to contest on all seats in Gujarat Legislative Assembly Polls 2022 says leader and Delhi CM Arvind Kejriwal)
केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल
केजरीवाल अहमदाबाद विमानतळावर पोहचले. तिथून ते थेट आश्रम रोडवरील आपच्या नव्या प्रदेश कार्यालयात पोहचले. या कार्यालयाचं उद्घाटन केजरीवालांच्या हस्ते झालं. यानंतर वल्लभ सदन हवेली मंदिर येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. येथे केजरीवाल पोहचले.
या पत्रकार परिषदेत केजरीवालांनी काँग्रेस आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. "काँग्रेस आणि भाजप गुजरातमध्ये दुकान चालवत आहेत. जेव्हा जेव्हा भाजपला मदतीची गरज होती तेव्हा तेव्हा काँग्रेस धावून आली आहे. दोन्ही पक्षांमध्ये 27 वर्षांपासूनची मैत्री आहे. ती मैत्री आजही कायम आहे. या दोघांमध्ये जनतेची पिळवणूक होत आहे", अशा शब्दात केजरीवालांनी दोन्ही पक्षांचा समाचार घेतला.
Aam Aadmi Party (AAP) to contest on all seats in the 2022 Gujarat Legislative Assembly Polls: AAP leader and Delhi CM Arvind Kejriwal pic.twitter.com/3GXvtPVfMt
— ANI (@ANI) June 14, 2021
"काँग्रेस भाजपच्या खिशात आहे. गुजरातमध्ये शेतकरी आत्महत्या करतायेत. सरकारी शाळांची स्थिती वाईट आहे. व्यापारी वर्गात भितीचं वातावरण आहे. या सर्व परिस्थितीला हे दोन्ही पक्ष जबाबदार आहेत. गुजरात मॉडलची अवस्था फार वाईट आहे. या मॉडलला आम्ही सुधारु", असा आशावाद केजरीवालांनी व्यक्त केला,
केजरीवालांची गुजरात दौऱ्याची ही दुसरी वेळ ठरली. याआधी केजरीवाल फेब्रवारी महिन्यात सूरतेत आले होते. त्यावेळेस स्थानिक पातळीवरील निवडणुकांमध्ये आपचा प्रमुख विरोधी पक्ष म्हणून नावारुपास आला होता.
संबंधित बातम्या :
पोस्ट कोव्हिडनंतर 'या' आजाराने डॉक्टरांची चिंता वाढवली.....
Petrol-Diesel Price: पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत पुन्हा वाढ, तुमच्या शहरातील किंमत जाणून घ्या