मुंबई : गेल्या 6 वर्षांपासून यौन शोषणाची शिकार ठरलेली एअरहोस्टेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नागरी उड्डान मंत्री सुरेश प्रभु यांच्याकडे मदत मागितली आहे. एयर इंडियाचे सीनियर एग्जक्यूटिव्ह मागील 6 वर्षांपासून यौन शोषण करत असल्याचा गंभीर आरोप एअरहोस्टेसने केला आहे. न्यायासाठी एयरलाईन्सच्या सर्व मंचावर तक्रार दाखल केली पण न्याय नाही मिळाला असं या एअरहोस्टेसने दावा केला आहे.
@sureshpprabhu @jayantsinha My complaint against Senior AI Executive of #sexualharassment #discrimination at the Workplace #AirIndia Internal Committee is Farce & Coverup. HELP @narendramodi @PMOIndia @BDUTT @fayedsouza @sagarikaghose @AUThackeray #MeToomvmt pic.twitter.com/AkgZ2rp7XV
— neetta karkhanis (@flyingpari) May 28, 2018
अनेक दिवसांपासून तक्रार दाखल करुनही कोणतीही सुरक्षा मिळालेली नाही आणि कोणता तपासही झालेला नाही. यौन शोषणाने आत्मविश्वाम तुटला आहे. एअरहोस्टेसने 25 मेला नागरी उड्डान मंत्री सुरेश प्रभु यांना पत्र लिहून न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. या पत्राची कॉपी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनेक संस्थांना देखील पाठवण्यात आली आहे.
Asked @airindiain CMD to immediately address this issue. If necessary, will appoint another committee
— Suresh Prabhu (@sureshpprabhu) May 29, 2018
एअरहोस्टेसने ट्विट केल्यानंतर त्यावर नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभु यांनी ट्विटवर माहिती दिली की, या प्रकरणावर एअर इंडियाच्या सीएमडींना चौकशीचे आदेश दिले आहेत. गरज पडली तर प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती देखील नेमली जाईल.