मुंबई : अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स कॅपिटलची विक्री प्रक्रिया आता सुरू झाली आहे. या अंतर्गत, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने नियुक्त केलेल्या प्रशासकाने रिलायन्स कॅपिटलच्या विक्रीसाठी स्वारस्य अभिव्यक्ती (EOI) आमंत्रित केले आहे. त्यामुळे लवकरच रिलायन्स कॅपिटल कंपनीचा लिलाव होऊन ती विकली जाणार आहे.
रिलायन्स कॅपिटलच्या मते, एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट सबमिट करण्याची शेवटची तारीख 11 मार्च आहे. त्याच वेळी, रिलायन्स कॅपिटलचा रिझोल्यूशन प्लॅन सबमिट करण्याची अंतिम तारीख 20 एप्रिल आहे.
गेल्या वर्षी 29 नोव्हेंबर रोजी RBI ने रिलायन्स कॅपिटल (RCL) चे संचालक मंडळ बरखास्त केले होते, कारण पेमेंटमध्ये चूक आणि कंपनीच्या स्तरावरील गंभीर समस्या लक्षात घेता, आरबीआयने कंपनीच्या निर्देशन मंडळाला भंग केलं होतं. त्याच वेळी RBI ने नागेश्वर राव वाय यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती.
त्यानंतर, रिलायन्स कॅपिटलने कंपनीविरुद्ध कॉर्पोरेट दिवाळखोरी रिझोल्यूशन प्रक्रिया (CIRP) सुरू करण्यासाठी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (NCLT) च्या मुंबई खंडपीठात अपील दाखल केले.
शुक्रवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी, रिलायन्स कॅपिटलच्या शेअरची किंमत आणखी खाली पडली. व्यवहाराच्या शेवटी, रिलायन्स कॅपिटलच्या शेअरची किंमत 2.48 टक्क्यांच्या घसरणीसह 13.75 रुपयांवर होती. ही सर्वात कमी रक्कम आहे.
तर कंपनीच्या बाजार भांडवलाबद्दल बोलायचे झाले तर ते 347.47 कोटी रुपये होणार आहे.