नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि माहिती व प्रसारणमंत्री स्मृती ईराणी यांनी राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी या दोघांना शपथ दिली आहे.
या शपथविधी सोहळ्याला केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज, अरुण जेटली, अनंत कुमार हे उपस्थित होते. पाच वेळा विधानसभेचे आमदार असेलेले अमित शाह पहिल्यांदाच राज्यसभेचे खासदार झालेले आहेत.
तसंच आता राज्यसभेत एनडीए बहुमतात आहे. अमित शाह यांच्या राज्यसभेतल्या आगमनानं मोठं भाजपला मोठं नैतीक बळ मिळणार आहे.