अमरावती : आजीच्या वयाच्या एका महिलेने वयाच्या ७४ व्या वर्षी दोन जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. आई आणि मुली दोघांची प्रकृती उत्तम आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. एर्रामत्ती यांनी कोथापेट येथील अहाल्या रुग्णालयात जुळया मुलींना जन्म दिला आहे.
आंध्र प्रदेशमध्ये रहाणाऱ्या एर्रामत्ती मंगम्मा यांची मातृत्वाची इच्छा वयाच्या ७४ व्या वर्षी पूर्ण झाली आहे. एर्रामत्ती यांचे पती राजा राव ८० वर्षांचे आहेत. हे जोडपे पूर्व गोदावरी जिल्ह्यातील नीलापार्थीपाडू गावामध्ये राहत आहेत.
Dr Umasankar, Director of Ahalya Hospital, Guntur: She approached our hospital last year for getting a baby through IVF method. Egg from a donor & sperm from her husband, were used. She conceived in January. She delivered twin girls today, both are healthy. Mother is in ICU. https://t.co/6zBBiHR1YP
— ANI (@ANI) September 5, 2019
आयव्हीएफ तंत्राच्या सहाय्याने एर्रामत्ती यांनी दोन जुळया मुलींना जन्म दिला आहे. यापूर्वी २०१६ मध्ये पंजाबमध्ये रहाणाऱ्या दलजिंदर कौर यांची वयाच्या ७० व्या वर्षी प्रसुती झाली होती.
एर्रामत्ती यांची शस्त्रक्रिया सुरळीत पार पडली. आई आणि मुली दोघांची प्रकृती उत्तम आहे. शस्त्रक्रियेच्यावेळी कुठलीही अडचण निर्माण झाली नाही, अशी माहिती डॉक्टर उमाशंकर यांनी दिली. वय जास्त असले तरी एर्रामत्ती यांना हायपरटेंशन, मधुमेह अशा आरोग्याच्या समस्या नसल्यामुळे प्रसुतीमध्ये कोणतीही अडचणी निर्माण झाली नाही, असे डॉक्टरांनी सांगितले.