घरी पाळणा हलत नसल्याने पतीने शेजारच्या महिलेसोबत... धक्कादायक प्रकार समोर

वंशाला मिळत नव्हता दिवा, पतीने केलं शेजारच्या महिलेसोबत केलं धक्कादायक कृत्य

Updated: Sep 18, 2022, 05:42 PM IST
घरी पाळणा हलत नसल्याने पतीने शेजारच्या महिलेसोबत... धक्कादायक प्रकार समोर title=

Crime News : विज्ञानाने इतकी प्रगती केली असली तरी काही लोकं अजून जादूटोण्यावर विश्वास ठेवताना दिसत आहेत. या अंधश्रद्धांमुळे अनेकांनी हकनाक आपला जीव गमावला आहे. असच एक प्रकरण समोर आलं आहे ज्यामध्ये  एका पतीने शेजारच्या महिलेची हत्या केल्याचं समोर आलं आहे. आरोपीचं नाव उमेश केवट असं आहे.

नक्की काय आहे प्रकरण? 
आरोपी उमेश केवटच्या घरी लग्नानंतर अनेक दिवस पाळणा हलत नव्हता. त्याला असा संशय होता की शेजारची महिला काही जादूटोणा करत आहे. संशयाचं भूत त्याच्या डोक्यात इतकं शिरलं की त्याने शेजारच्या महिलेला संपवून टाकण्याचं ठरवलं. मृत महिलेचं नाव कलेसिया असं असून ती 50 वर्षांची होती. 

शनिवारी संध्याकाळच्या सुमारास महिला तलावाकडून घरी येत होती. याचाच फायदा आरोपीने घेतला. संध्याकाळच्या सुमारास मृत महिला ही घराच्या दिशेने जात असताना आरोपी उमेश केवटने धारदार शस्त्राने तिच्यावर वार करत तिला संपवून टाकलं. पोलिसांना माहिती झाल्यावर पूर्ण परिसरात नाकाबंदी केली. पोलिसांनी नाकाबंदी केल्यामुळे आरोपी केवटला ताब्यात घेणं शक्य झालं. 

आरोपी उमेशला ताब्यात घेतल्यावर त्याने पोलिसांना माहिती देताना, कलेसिया ही शेजारी राहत होती, ती मला शिवीगाळ करत असायची. माझ्या पत्नीची तब्येत कायम बिघडलेली असायची, असं सांगितलं. 

दरम्यान, पोलिसांनी आरोपी उमेशने हत्या करताना वापरलेलं हत्यार जप्त केलं. त्यासोबतच उमेशवर आयपीसी कलम 302, एससी-एसटी अॅक्टच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यामधील पोढी गावची आहे.