मुंबई : देशातील मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, मिझोराम छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये विधानसभा निकालानंतर काँग्रेसमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. तर दिल्लीपासून गल्लीपर्यंत काँग्रेसमध्ये आनंदाला उधाण आलेय तर भाजपच्या गोठात शांतता दिसून येत आहे. भाजप कार्यालयाबाहेर असणारी गर्दी एकदम दिसेनाशी झालेय. तर विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी जल्लोष करण्यास सुरुवात केली. हा विजय राहुल गांधीसाठी असल्याची प्रतिक्रीया काँग्रेस कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.
Rajasthan: #Visuals from BJP state office in Jaipur. #AssemblyElections2018 pic.twitter.com/Ii8MIT3Ftk
— ANI (@ANI) December 11, 2018
महाराष्ट्रातही काँग्रेसमध्ये उत्साह आहे. नाशिकमध्येही काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष केला. नाशिकच्या एमजी रोडमधील काँग्रेस कार्यालयाबाहेर पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. तसेच मुंबईतही काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत आहेत. एकमेकांचे पेढे भरवून पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये राजस्थान आणि छत्तिसगढमध्ये काँग्रेसशी सरशी झालीये तर मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारली आहे. तेलंगणामध्ये के चंद्रशेखऱ राव यांची जादू कायम आहे तर मिझोरामध्ये मिझो नॅशनल फ्रंटचा बोलबाला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची सेमाफायनल मानल्या जाणा-या पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पास झालेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी हा कठीण असा परीक्षेचा काळ आहे. सेमीफायनलमध्ये राहुल गांधींची सरशी झालीये. त्यामुळं आता २०१९ ला जोरदार संघर्ष पहायला मिळणार आहे.
छत्तीसगड आणि राजस्थान निवडणुकांमध्ये काँग्रेसनं मिळवलेल्या विजयाचं पुण्यातही जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं. पुण्यातील काँग्रेस भवनात फटाके फोडून विजयाचा जल्लोष करण्यात आला. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरवत आपला आनंद साजरा केला.
२०१९ मध्ये देशात पुन्हा एकदा काँग्रेसचीच सत्ता येऊन भाजपाची घरवापसी निश्चित असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी दिलीय. पाच राज्यांच्या निवडणुकीत मोदी, मशीन आणि मनी चालले नाही असा टोलाही त्यांनी पत्रकार परिषदेत लगावला.
निवडणुकीत मिळालेल्या या यशानं राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण आलंय. जळगावात तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीनं माजी तालुकाध्यक्ष संजय वराडेंच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. देशात मोदी लाट आता ओसरली असून काँग्रेस नेते राहुल गांधींची लाट आता आलीय. काँग्रेस हा महात्मा गांधीच्या विचारांचा पक्ष असून तीन राज्यातील निवडणुकीतील यश हे गांधी विचारांचं यश आहे. २०१९ च्या निवडणुकीच्या विजयाची ही नांदी असल्याचं मत यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यानी व्यक्त केलं.