नवी दिल्ली : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आज दिल्लीत येत आहेत. दिल्लीतल्या टाऊन हॉलमध्ये आयोजित बैठकीत बराक ओबामा सहभागी होणार आहेत.
मात्र या बैठकीसाठी येण्याकरता तोंडावर मास्क घालूनच या असं आवाहन, प्रदुषणाबाबतचे डेटा शास्त्रज्ञ अमृत शर्मा यांनी केलं आहे. अमृत शर्मा यांनी तसं खुलं पत्रच ओबामांना लिहिलं आहे. देशाच्या राजधानीतल्या वाढत्या प्रदुषणाबाबत जागरुकता निर्माण व्हावी यासाठी आपण हे पत्र लिहिल्याचं शर्मा यांनी सांगितलंय.
शर्मा हे सुद्धा ओबामा यांच्यासोबत चर्चासत्रात भाग घेणार आहेत. दखल घेण्यासारखी बाब म्हणजे, दिल्लीतल्या हवेची गुणवत्ता गेले सलग सात दिवस अत्यंत खराब श्रेणीमध्ये राहिली आहे.