Sourav Ganguly : भारतीय क्रिकेट संघाचे (Team India) माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) क्रिकेटनंतर आपल्या नव्या इनिंगला सुरुवात करणार आहेत. सौरव गांगुली सध्या स्पेनमध्ये (Spain)असून माद्रीदमधल्या एका कार्यक्रमात त्यांनी याबाबतची घोषणा केली. सौरव गांगुली यांच्याबरोबर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीदेखील परदेश दौऱ्यावर आहेत.
नव्या इनिंगला सुरुवात
क्रिकेटनंतर सौरव गांगुली उद्योग क्षेत्रात पाऊल टाकतायत. पश्चिम बंगालमधल्या पश्चिम मेदिनीपूर इथल्या सालबोनीमदध्ये एका स्टील फॅकट्रीची सुरुवात ते करणार आहेत. याची घोषणा त्यांनी एका कार्यक्रमात केली आहे. क्रिकेट जगतात आपल्या कामगिरीने छाप उमटली. त्यानंतर सौरव गांगुली राजकारणात सक्रीय होणार अशा चर्चा जोर धरु लागल्या होत्या. पण त्यांनी उद्योगक्षेत्रात पाऊल टाकलं आहे. स्टील प्रोडक्शन कंपनीची ते सुरुवात करणार आहेत. सौरव गांगुली पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबरोबर स्पेनमध्ये आहेत. तृणमुल काँग्रेसचे प्रवक्ता कुणाल घोषम यांनी आपल्या फेसबूक पेजवर यासंदर्भातील माहिती दिली आहे.
पीटीआय रिपोर्टनुसार ममता बॅनर्जी आणि सौरव गांगुली 12 दिवसांच्या स्पेन आणि दुबई दौऱ्यावर आहेत. स्पेनमधल्या माद्रिद इथं बंगाल ग्लोबल बिझनेस समिटचं आयोजित करण्यता आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना सौरव गांगुली यांनी आपल्या नव्या इनिंगची घोषणा केली.
एका वर्षात प्लान्ट सुरु
पश्चिम बंगालमध्य स्टिल प्लांटला परवानगी दिल्याबद्दल सौरभ गांगुली यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे आभार मानले. पश्चिम बंगालमधला हा तिसरा मोठा स्टिल प्लांट असेल. येत्या वर्षभरात हा स्टिल प्लांट पूर्ण होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
उद्योगपती घराण्याशी संबंध
बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली हे उद्योगपती घराण्याशी संबंधीत आहेत. 50-55 वर्षांपूर्वी सौरव गांगुली यांच्या आजोबांनी बंगालमध्ये एक लहानसा व्यवसाय सुरु केला होता. याची आठवण सौरव गांगुली यांनी करुन दिली. पश्चिम बंगाल सरकारने आंतरराष्ट्रीय गुंतवणूकीसाटी नेहमीच पाठिंबा दिल्याचंही गांगुली यांनी सांगितलं.
भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सौरव गांगुली राजकारणात उतरणार अशा चर्चाांनी जोर धरला होता. 6 मे 2022 रोजी गृहमंत्री अमित शाह यांनी सौरव गांगुली यांची भेट घेतली होती. शाह गांगुलीच्या कोलकाता इथल्या निवासस्थानी डिनरसाठीआले होते. या दोघांच्या भेटीनंतर गांगुली भारतीय जनता पक्षात (BJP) सामील होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र गांगुली यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला होता.