Taj Mahal : ताजमहालावर जप्तीच्या कारवाईची टांगती तलवार

जगातील आश्चर्यांपैकी एक असलेला ताजमहाल. (Taj Mahal) सध्या कर थकबाकीच्या वादात अडकला आहे. तब्बल 1 कोटी 40 लाखांची थकबाकी आहे. (Taj Mahal property and water tax)   

Updated: Dec 21, 2022, 10:37 AM IST
Taj Mahal : ताजमहालावर जप्तीच्या कारवाईची टांगती तलवार  title=

Taj Mahal News : जगातील आश्चर्यांपैकी एक असलेला ताजमहाल. (Taj Mahal) सध्या कर थकबाकीच्या वादात अडकला आहे. 15 दिवसांत कर भरला नाही तर ताजमहालावर जप्तीची कारवाई करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. पाणी आणि मालमत्ता कराची तब्बल 1 कोटी 40 लाखांची थकबाकी आहे. (Taj Mahal property and water tax)  ही थकबाकी 2021-22 आणि 2022-23 या आर्थिक वर्षाची आहे. 

15 दिवसांत थकीत कर जमा केला नाही तर ताज महाल जप्त केला जाईल असं नोटिशीत म्हटलंय. मात्र भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अधिका-यांनी थकबाकीवर हात वर केलेत. स्मारकांना मालमत्ता कर लागू होत नाही तसंच ताजमहालचा कोणताही व्यावसायिक वापर नसल्यामुळे पाण्यावरील कर भरण्यास पुरातत्व सर्वेक्षण जबाबदार नाही असं त्यांनी म्हटले आहे.

ऐतिहासिक वास्तू ताजमहालला सुमारे एक कोटी रुपये भरण्याची नोटीस आग्रा महानगरपालिकेने  बजावली आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला नोटीस बजावून त्यांना दीड लाख रुपयांचा मालमत्ता कर भरण्यास सांगितले आहे. 15 दिवसांत थकबाकी न भरल्यास मालमत्ता जप्त करण्यात येईल, असेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. (Agra Municipal Corporation issued a notice to the Archaeological Survey of India)

दरम्यान, ऐतिहासिक वास्तूंवर मालमत्ता कर लागू होत नसल्याचे एएसआय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पाण्याचा वापर व्यावसायिक कारणासाठी होत नसल्याने पाण्याची टाकी बंद करण्याचा नियम नाही. ताजमहालच्या सभोवतालची हिरवळ टिकवण्यासाठी पाण्याचा वापर केला जातो. अशा प्रकारची ही पहिलीच नोटीस आहे, असे सांगण्यात आले आहे. आग्रा महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ताजमहालचा समावेश असलेल्या क्षेत्रातील कर अटी निश्चित करण्यासाठी एका खासगी कंपनीला नियुक्त केले गेले आहे आणि त्यांनी नोटीस पाठवली असावी.

ताजमहालबाबत...

सुमारे 400 वर्षांपासून ताजमहाल उत्तर प्रदेशमधील आग्रा शहराच्या अगदी दक्षिणेस उभारण्यात आला आहे. जगातील सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य म्हणून ओळख आहे. प्रेमाचे प्रतिक आहे. प्रेमाचे एक चमकणारे पांढरे स्मारक म्हणून ओळख आहे. मुघल सम्राट शाहजहानच्या आज्ञेनुसार त्याची प्रिय पत्नी मुमताज महलच्या स्मरणार्थ ही प्रतिष्ठित वास्तू बांधण्यात आली आहे. दरम्यान, प्रदुषणामुळे ताजमहालची चमक कमी होत असल्याचे सांगितले जात आहे. औद्योगिक प्रदूषणामुळे ताजहमहालचे पांढरे संगमरवरी हिरवे, काळे, तपकिरी आणि पिवळे होऊ लागले आहेत. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सरकारला या वास्तूचे जतन करण्याचा आदेश दिला होता.