नवी दिल्ली : जीएसटीबाबत सरकारनं व्यापा-यांना मोठा दिलासा दिलाय. आता दर महिन्याऐवजी तीन महिन्यांनी एकदाच जीएसटी फाईल करावा लागणार आहे. यामुळे पाच कोटींपेक्षा जास्त व्यापा-यांना दिलासा मिळणार आहे. नवी दिल्लीमध्ये जीएसटी परिषदेची बैठक पार पडली. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी ही घोषणा केली आहे.
तसंच एक कोटीपर्यंत उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना एक टक्के जीएसटी, एक कोटी पर्यंत उलाढाल असलेल्या उत्पादकांना २ टक्के आणि एक कोटी रुपयापर्यंत उलाढाल असलेल्या हॉटेल्सना ५ टक्के जीएसटी लावण्यात येणार आहे.
दोन लाखांपर्यंतच्या दागिने खरेदीसाठी पॅन कार्डची अट काढून टाकण्यात आली आहे. मात्र दोन लाखांवरील दागिने खरेदीसाठी पॅन बंधनकारक करण्यात आलंय. सराफा व्यापा-यांना मनी लाँडरिंग कायद्यातून बाहेर ठेवण्यात आलंय. त्यामुळं सराफांना सर्वात मोठा दिलासा मिळालाय.