Crime News: समाजात हल्ली अनेक वादग्रस्त प्रकार घडत असतात. त्यातून लग्नानंतरही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर (Love affair) ठेवणाऱ्या मंडळींच्या ह्या ना त्या बातम्या आपण ऐकत असूच. सध्या अशीच एक बातमी समोर येते आहे. जी ऐकून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. बिहार येथे हा प्रकार घडला असून आपल्या चौकोनी (Family) परिवार असताना एक माणसानं परस्त्रीशी प्रेमसंबंध ठेवले आणि आपल्या प्रेयसीसोबत पळून गेल्याचे पाहून तेथील गावकऱ्यांनी चक्क त्या दोघांचे लग्नच लावून(Crime News) दिले तुम्हाला वाटेल की नक्की असं काय झालं की गावकऱ्यांना माहिती असूनसुद्धा त्यांनी लग्न झालेल्या माणसाचे त्याच्या प्रेयसीशी का बरं लग्न लावून दिले असेल? तर हो, येथे अनेक ट्विस्ट आहेत. जाणून घेऊया की हा धक्कादायक प्रकार नक्की आहे तरी काय?
होळीच्या दिवशी एक 30 वर्षीय लग्न झालेला माणूस आपल्या प्रेयसीला रात्री भेटायला गेला. त्या दोघांना तिथल्या तिथेच गावकऱ्यांनी पकडले. त्याच्या एक्स्ट्रा मॅरिटियल प्रकरणाची सगळ्यानांच कल्पना होती. त्यामुळे गावकऱ्यांना त्याला परस्त्रीबरोबर पाहताच राग अनावर झाला. त्यांच्यात त्यानंतर अनेक वादही झाले. परंतु पारडं पलटलं आणि त्या गावकऱ्यांनी त्या दोघांचे लग्नच (Bihar Crime) लावून दिलं.
या माणसाच्या प्रेयसीचे याआधीही लग्न झाले होते. त्यातून तिचं लग्न टिकू शकलं नाही. त्यानंतर ती आपल्या आईवडिलांसोबत राहू लागली होती. त्यानंतर तिला हा माणूस भेटला. त्यांच्या लग्नाचा एक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होतो आहे. त्यात ते दोघं कबूल करतात की त्या दोघांचे अनेक महिने लव्ह अफेअर होते.
होळीच्या रात्री प्रियकर (Love) आपल्या प्रेयसीला भेटायला गेला आणि त्यांना त्यांचा वेळ तर घालवता आला नाही परंतु त्याच्या गावकऱ्यांनी त्यांना पकडलं आणि शिक्षा म्हणून म्हणा नाहीतर काहीही त्यांचे लग्नच लावून दिलं.
प्रियकराच्या बायकोला मात्र या प्रकरणानं जबर धक्का बसला आहे. आता मी कूठे जाऊ मला काहीच कळत नाही. आमचे दहा वर्षांपुर्वीच लग्न झाले आहे आता माझ्या मुलांचे काय होईल. अशी गयावया ती माऊली करते आहे. या प्रकरणानं त्यांच्या कुटुंबियांनाही धक्का बसला आहे. त्यामुळे आता या प्रकरणानं काहीतरी वेगळंच वळण घेतलं आहे. असे प्रकार सध्या राज्याच्या अनेक भागातही घडताना दिसत आहे.