बाप इम्रान हाश्मी, आई सनी लियोनी! मुलाचा फोटो यूजर्स पाहून म्हणाले - ‘वाह क्या सीन है!’

Bihar Student Viral Exam Form: सोशल मीडियावर एका विद्यार्थ्याचा परीक्षेचा फॉर्म व्हायरल होत आहे. या फॉर्म पाहून नेटकऱ्यांनाही हसू आवरणं मुश्कील झालं आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 9, 2024, 01:13 PM IST
बाप इम्रान हाश्मी, आई सनी लियोनी! मुलाचा फोटो यूजर्स पाहून म्हणाले - ‘वाह क्या सीन है!’ title=
Bihar Student enlist his parents names as emraan hashmi and sunny leone on exam form post goes viral

Bihar Student Viral Exam Form: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगू शकत नाही. अनेकदा एखाद्या विषयाला धरुन मीम्स व्हायरल होतात तर कधी एखादा फोटो व व्हिडिओ चांगलाच चर्चेचा विषय होऊन जातो. अलीकडेच एका विद्यार्थ्याच्या परीक्षेच्या फॉर्म चांगलाच व्हायरल होत आहे. लोकांनी हा फॉर्म पाहून विद्यार्थ्याला चांगलंच ट्रोल केले आहे. कारण विद्यार्थ्याच्या या फॉर्ममध्ये वडिलांचे नाव इम्रान हाश्मी आणि आईचे नाव सनी लियोनी असं लिहिण्यात आलं आहे. या फॉर्मचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. 

कुंदन नावाच्या विद्यार्थ्याचा हा परीक्षा फॉर्म असून 2017-2020 मधील असल्याचा दावा केला जात आहे. याच दरम्यान तो बिहार येथील बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठात शिकत होता. हा फोटो इन्स्टाग्रामवर एका अकाउंटवरुन शेअर करण्यात आला होता. तर, त्याखाली कॅफ्शन दिलं होतं. 'बॉलिवूड'. या पोस्टला आत्तापर्यंत दोन लाखाहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. तर, अनेक युजर्सनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहे. मात्र, झी 24 तास या पोस्टची पुष्टी करत नाही. 

या पोस्टच्या खाली अनेकांनी कमेंट केल्या आहेत. काहींनी कमेंट केली आहे की, कुंदनने चित्रपटसृष्टीत त्याचे करिअरची सुरुवात करायला हवी. शिक्षण विसरुन या मुलाने स्क्रिप्ट रायटिंग करायला हवे. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा फोटो जवळपास दोन वर्षांपूर्वीचा असून तो आता पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. पण या फोटो खरा आहे की खोटा याची पुष्टी मात्र होऊ शकलेली नाही. 

इतकंच नव्हे तर, या आधीही परिक्षा फॉर्मवर एका बॉलिवूडशी कनेक्शन जोडलं होतं. यंदा फेब्रुवारीमध्ये एका व्हायरल झालेल्या फोटोत उत्तर प्रदेश पोलिस कॉन्स्टेबलच्या भरती परीक्षेचा अॅडमिट कार्डवर अभिनेत्री सनी लिओनीचे नाव देण्यात आले होते. या अॅडमिट कार्डचे दोन फोटो व्हायरल झाले होते त्यात सनी लिओनीचे नाव होते. तसंच, परीक्षा केंद्र कन्नोजच्या श्रीमती सोनेश्री मेमोरियल गर्ल्स कॉलेज म्हणून देण्यात आले होते. हा फोटोही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. 

फोटो व्हायरल झाल्यानंतर यूपी पोलिसांवर निशाणाही साधण्यात आला होता. मात्र नंतर उत्तर प्रदेश बऱती आणि संवर्धन बोर्डाने यावर प्रतिक्रिया देत स्पष्ट केलं की प्रवेश पत्र बनावट होतं.