नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत काँग्रेस आणि काँग्रेसच्या राजघराणं संस्कृतीवर टीका केली. त्यांनी म्हटलं की, जनता राजघराणेशाहीला नाकारत आहे. राहुल गांधी भारताच्या गरिमेकडे दुर्लक्ष करीत आहेत. विदेशात जाऊन राहुल गांधी भारताच्या गरिमेला खराब करत असल्याचं देखील भाजपने म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदी गरिबांच्या हिताचे निर्णय घेत आहेत. अमित शाह यांनी कार्यकारणी बैठकीच्या दुसऱ्या दिवशी, भाजप 2019 च्या निवडणुकीत 2014 च्या निवडणुकीपेक्षा मोठे विजय मिळवेल असा दावा केला आहे. ते म्हणाले की आम्ही भ्रष्टाचारमुक्त आणि जातीवादमुक्त भारत बनवण्याचा संकल्प घेतला आहे.
भाजपच्या राज्यात एकही भ्रष्टाचार झालेला नाही. देशाच्या प्रत्येक नागरिकाला वाटतं की, देश अस्वच्छ, गरिबी, तुष्टीकरणच्या राजकारणातून मुक्त व्हावा. भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. न्यू-इंडियाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कार्यकर्त्यांना यामध्ये सहभागी होण्यास सांगितलं आहे.
पीयूष गोयल यांनी म्हटलं की, कार्यकारणी बैठकीत पश्चिम बंगाल आणि केरणमध्ये झालेल्या हिंसेची निंदा केली आहे. भाजप कार्यकर्ते हिंसेला नाही घाबरणार. हिंसाच्या विरोधात भाजप केरळमध्ये ३ ते १३ ऑक्टोबर दरम्यान पदयात्रा करणार आहे.