श्रीनगर: लाल चौकात तिरंगा फडकवण्यासाठी 'तिरंगा यात्रे' साठी निघालेले भाजप युवा संघटनेचे सुमारे २०० कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ताब्यात घेण्यात आलेल्या विभिन्न कार्यकर्त्यांना विविध पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.
काही कार्यकर्त्यांना सोमवारी तर काही कार्यकर्त्यांना मंगळवारी अबी गुलजारमधून ताब्यात घेण्यात आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, लाल चौकात ते तिरंगा फडकवायला आले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना अजूनही कस्टडीमध्ये ठेवण्यात आले आहे. बख्शी स्टेडियममध्ये कार्यक्रम संपत नाहीत तो[पर्यंत त्यांना ताब्यात ठेवण्यात येईल. यावेळी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी सांगितले की, कार्यकर्त्याना ताब्यात घेण्याचे सरकारने आधीच ठरले होते. त्यांनी ट्विट केले की, भाजप सरकारने जम्मू काश्मिरमध्ये राष्ट्रीय ध्वज फडकवण्यास जाणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.