Business Ideas : 2023 चा जमाना आहे तो म्हणजे महागाई, प्रदूषण आणि बदलत्या जीवनशैलीचा. त्यामुळे आपल्यालाही या काळाशी समरूप होणं म्हत्त्वाचं आहे त्यातून अशा काळात आपल्यालाही आपल्या आर्थिक गरजा (Financial Tips) पुर्ण करणे बंधनकारक असते. त्यामुळे आपल्यालाही कुठलातरी पैशांचा स्त्रोत (Source of Money) सुरू करणे आवश्यक असते. नोकरी करून अनेकांना कंटाळा आलेला असतो. त्यातून लोकं ही बिझनेस सुरू करण्याच्याही तयारीत असतात. तेव्हा आपणही आपल्याकडे जरा एक चांगली आयडिया असेल तर आपणही एकावेळी चार बिझनेस (Business Idea) सुरू करू शकतो. तुम्हाला जर का बिझनेसमधून कमाई करायची असेल तर तुम्हीही काही बिझनेस आयडिया आजमावू शकता. आम्ही आता तुम्हाला अशाच काही बिझनेस आयडियाबद्दल सांगणार आहोत.
अनेकांना होममेड (Homemade) गोष्टी तयार करायला आणि विकायला आवडतात. त्यातील एक गोष्ट म्हणजे कुकींग. सणासुदीच्या आणि लग्नसभारंभांच्या दृष्टीनं अनेकजणं या कलेकडे वळताना दिसतात. अनेकांनी याबाबतीत युट्यूब चॅनल नाहीतर स्वत:चा कॅफेटेरियाही (Cafeteria Business) सुरू करण्याच्या प्रयत्नात असतात. त्यासाठी योग्य तेव्हा योग्य त्या प्रोडक्टचे मार्केटिंग (Product Marketing) सुरू करणेही आपल्यासाठी महत्त्वाचे असते. तेव्हा कुकींग (Cooking Business) या क्षेत्रात आपल्याला भरपूर स्कोप आहे. त्यामुळे आपल्यालाही त्याप्रमाणे कच्चा मालाच्या तयारीपासून ते अंतिम प्रोडक्टपर्यंत सर्वच गोष्टींची तयारी करावी लागते. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया या लेखातून की तुम्ही आता कोणत्या गोष्टींचा बिझनेस सुरू करू शकता.
वर म्हटल्याप्रमाणे तुम्ही कुकींग क्षेत्रात चांगल्या प्रकारे आपला स्वत:चा बिझनेस सुरू करून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला केक बनविण्याचे सर्व पदार्थ विकत घ्यावे लागतील त्यातून त्यासाठी या मार्केटमध्ये प्रोडक्ट रेंज (Product Range) म्हणजे पदार्थांची विकण्यासाठी किती संधी उपलब्ध आहेत याचा विचार करणे आवश्यक ठरते तुम्ही जर का पदार्थ तयार केलात तर तो मासेस आणि क्लासेसस (गर्दी आणि दर्दी) यांच्यापर्यंत पोहचवणे गरजेचे ठरते तरच तुमची एक गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचू शकते. तेव्हा केक आणि कलनिरी आर्ट्सचे मार्केट (Culinary Arts) हे व्यापक आहे. तुम्ही जितके पदार्थ बनवाल आणि ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवाल तेवढेच कमी आहे.
आपल्याला हॅण्डमेड गोष्टीही विकता येतात. जसे की आपण हातानं तयार केलेल्या गोष्टी म्हणजेच कपडे, चादरी, वस्तू, हातानं शिवलेल्या गोष्टी, स्टेशनरी अशा अनेक गोष्टींची समावेश होतो त्यामुळे अशी काही गोष्टी तुम्ही आरामात विकू शकता. त्यासाठी तुम्हाला विविध माध्यमं शोधणे आवश्यक असते जिथे तुमचे प्रोडक्ट्स (Product Delivery) हे अधिकाअधिक लोकांपर्यंत पोहचतील. थोडक्यात तुम्हाला या गोष्टींचे मार्केटिंग करावे लागते. म्हणजेच उदाहरणार्थ, समजा तुम्ही कपडे विकत आहेत. तर त्यासाठी तुमचा टार्गेट ऑडियन्स हा जास्त करून तरूण आणि कमवता वर्ग असेलच. तेव्हा कॉलेज, शाळा आणि ऑफिसमधून तुम्ही तुमच्या या प्रोडक्टचे प्रमोशन करू शकता.
स्त्रियांना पार्लर काढण्याचीही महत्त्वाकांक्षा असते तेव्हा तु्म्ही अशा वेळी पार्लरमधून (Parlour) तुम्ही तुमचा बिझनेस सुरू करू शकता. त्यातून यासाठी तुम्हाला तुमचा ग्राहक वर्ष हा कमावता ग्राहकवर्ग शोधावा लागेल. त्यामुळे त्यारीतीनं तुम्ही जागा विकत घेऊ शकता आणि मग त्यानंतर आपले सर्व पार्लरला आवश्यक असणारे साहित्य घेऊन ब्युटीपार्लर सुरू करून घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला अनेक गोष्टींची काळजीही घ्यावी लागते.
तुम्ही छोटा फूड पार्लर अथवा छोटं फूड कोर्ट (Food Cafe) काढू शकता. यातून तुम्हाला चांगला फायदा होईल. यासाठी तुम्ही घरातले साहित्य वापरून अनेक गोष्टी करू शकता. तुम्ही काही गोष्टी जर का घरच्या स्वयंपाक घरासाठी काढत असाल तर तुम्हाला फक्त थोडासा जास्त गोष्टी या आपल्या कॅफेसाठी आणू शकता आणि घरच्या घरीही आपल्याला आवडेल त्या गोष्टी तयार करून विकू शकता.
सध्याचा सिझनचा विचार केलात तर तुम्ही आईस्क्रिम पार्लरही काढू शकता. त्यातून यात तुम्हाला चांगला प्रॉफिट (Profit) मिळेल. यातून तुम्ही चांगल्या प्रोडक्टची ओळख ग्राहकांना करून देऊ शकता. असे पदार्थ हे अनेकांना खायला आवडतात. त्यातून सिझनल फूडची ही मागणी सर्वाधिक असते तेव्हा एक आईस्क्रीम स्टोअर विकत घ्या आणि आईस्क्रिमच्या साहित्यांसह तुम्ही आईस्क्रिम पार्लर काढू शकता.
हल्ली कपडे, साड्या विकायचा बिझनेसही तुम्ही करू शकता. काही ठिकाणाहून तुम्हीही होलसेलिंग (Wholselling) करू शकता आणि आपल्या रेट्समध्ये विकू शकता.