मुंबई : आपल्याला कुठेही प्रवास करायचं झालं तर आपण रेल्वेनं प्रवास करतो. याचं तिकिट ही स्वस्त असल्यानं लोकांना ते परवडतं. ट्रेन आपल्याला कमी वेळेत निश्चित स्थानी पोहोचवते. परंतु याच कारणामुळे याची तिकट काढण्यासाठी लाखो लोक गर्दी करतात. ज्यासाठी लोकांना बराच वेळ वाया जातो. म्हणून रेल्वेने आता एक एक मोबाइल अॅप जारी केले आहे, जेणेकरुन लोक रांगेत न थांबता प्लॅटफॉर्म तिकीट किंवा प्रवासाचे तिकीट काढू शकतील.
UTS (अनरिझर्व्ड तिकीट प्रणाली) नावाच्या या मोबाईल अॅपवर तुम्ही रेल्वे स्थानकात प्रवेश करण्यापूर्वी तिकीट काढू शकता.
परंतु या अॅपसंदर्भात लोकांनाच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यात सर्वांच्याच डोक्यात असलेला एक प्रश्न म्हणजे जर तिकीट न काढता मी ट्रेनमध्ये चढलो / चढले, तेवढ्यात समोरून टीसी दिसला तर? अशावेळीस UTS अॅपवरून प्लॅटफॉर्म तिकीट किंवा प्रवासाचे तिकीट काढता येतं का? किंवा के वॅलिड असतं का?
तुम्ही यूटीएस अॅपवर मोबाइलद्वारे सामान्य तिकीट बुकिंग करू शकता. याद्वारे तुम्ही द्वितीय श्रेणी किंवा जनरल तिकीट काढून प्रवास करू शकाल. यासोबतच तुम्ही त्यावर प्लॅटफॉर्म तिकीटही काढू शकता. यासह, तुम्ही त्यावर मासिक हंगामी तिकीट किंवा MST देखील तयार करू शकता.
सहसा या सेवा पूर्वी फक्त रेल्वे स्थानकाच्या सामान्य तिकीट खिडकीवर उपलब्ध होत्या. परंतु आता त्या या अॅपवर देखील उपलब्ध झाल्या आहेत, ज्यामुळे लोकांचा भरपूर वेळ वाचत आहे.
UTS अॅपचा गैरवापर होऊ नये यासाठी रेल्वेने काही विशेष उपाययोजना केल्या आहेत. सर्वप्रथम, रेल्वेने देशभरातील रेल्वे स्थानके आणि रेल्वे मार्गांचे जिओ फेन्सिंग केले आहे. त्यामुळे कोणताही प्रवासी रेल्वे स्टेशन किंवा ट्रेनमध्ये या अॅपद्वारे तिकीट कापू शकत नाही.
एवढेच नाही तर तुम्ही कोणत्याही रेल्वे स्थानकाच्या चार-पाच किलोमीटरच्या सर्कलमध्ये असाल तरच या अॅपवरुन तिकीट निघेल. परंतु जर तुम्ही या श्रेणीबाहेर असाल तर तिकीट निघणार नाही.
बऱ्याच लोकांना वाटतं की, जर समोरुन टीसी किंवा टीटीई आला तर, त्याने आपल्याला पकडण्यापूर्वी आपण तिकीट काढू आणि त्याला दाखवू, नाहीतर विना तिकीट फिरु. परंतु तुम्हाला तसं करता येणार नाही.
कारण रेल्वेच्या या अॅपच्या वरील योजनेमुळे म्हणजे तुम्ही रेल्वे स्टेशन किंवा ट्रेनमध्ये असतना तुमच्याकडून तिकीटत निघणार नाही. त्यामुळे अशावेळी तुम्हाला जर टीसीने पकडलं तर, तुम्हाला विना तिकीट प्रवासी म्हणूनच पकडले जाईल किंवा कारवाई केली जाईल.