नवी दिल्ली : इंजिनिअरिंगची डिग्री असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरीची संधी आहे. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ एडव्हान्स कंप्यूटिंगमध्ये प्रोजेक्ट इंजिनिअर किंवा प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून नोकरी करण्याची संधी मिळू शकते. या भरतीसाठी योग्य उमेदवार ११ मार्च २०२० पर्यंत यासाठी अर्ज करु शकतो. उमेदवाराची निवड मुलाखतीच्याआधारे केली जाणार आहे. या भरतीसाठी उमेदवाराला परीक्षा फी द्यावी लागणार नाही.
पद - प्रोजेक्ट इंजिनिअर/ प्रोजेक्ट मॅनेजर
पदांची संख्या - १३२
पात्रता - B.E./B.Tech, MCA
वेतन - ४६५०० रुपये, ६४०००/- रुपये प्रति महिना
वयोमर्यादा - ३७ ते ५० वर्ष
या पदांसाठी २५ फेब्रुवारी २०२० पासून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुरुवात झाली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ मार्च २०२० आहे.
या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार, अधिक माहितीसाठी सीडॅक (CDAC) www.cdac.in या वेबसाईटवर माहिती घेऊ शकतो. ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने भरतीबाबतच्या संपूर्ण अटी लक्षपूर्वक वाचणं आवश्यक आहे.
उमेदवराचा ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक अचूक असणं गरजेचं आहे. शिवाय फोटोची स्कॅन कॉपी (४०० KBहून कमी) आवश्यक आहे. या भरतीसाठी सर्वाधिक ७५ जागा प्रोजेक्ट इंजिनिअरसाठी (सॉफ्टवेअर एप्लिकेशन डेव्हलपर) आहेत.
सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ एडव्हान्स कंप्यूटिंग, भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचा भाग आहे. सीडॅक सध्या डिजिटल हेल्थ, ई-गव्हर्नन्स, ट्रान्सपोर्टेशन आणि ट्रांजिट एप्लिकेशन्स, कम्यूनिकेशन्स, सायबर सिक्योरिटी, आर्टिफिशिल इंटेलिजेंससारखे अनेक प्रोजेक्ट हाताळत आहे. संस्थेकडून या प्रोजेक्टमध्ये रिक्त जागांसाठी भरती सुरु करण्यात आली आहे.