Chandrayaan-3 : भारतीय अंतराळ एजन्सी इस्रोने मोठी झेप घेतली आहे. अवकाशात झेपावलेले चांद्रयान-3 हे पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून चंद्राच्या कक्षेत आले आहे. चांद्रयान-3 हे आता चंद्राच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत स्थिरावले आहे. 'इस्रो' चे मिशन मून इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर येवून पोहचले आहे. 23 किंवा 24 ऑगस्ट रोजी चांद्रयान-३चे चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग करणार आहे. चंद्रावर उतरण्याआधी चांद्रयान-3 मध्ये होणार आहे. चांद्रयान-3 चे वजन 3900 वरुन 2100 किलोवर येणार आहे.
14 जुलै रोजी चांद्रयान-3 हे दिशेने झेपावले. संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या या चांद्रयान-3 मोहिमकडे होते. सर्व भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण होता. चांद्रयान-3 ही मोहीम भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मिशन ऑपरेशन्स कॉम्प्लेक्स, इसरो टेलिमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क, बंगळुरूकडून हे यान लॉन्च करण्यात आले असून येथूनच कंट्रोल केले जात आहे.
5 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या तिसऱ्या चंद्र मोहिमेतील हा अतिशय महत्त्वाचा टप्पा यशस्वीरीत्या पार पडला आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याआधी एकूण 4 वेळा चांद्रयानचे ऑर्बिट बदलले जाणार आहे. आता चांद्रयान-3 चंद्राभोवती परिभ्रमण करत चंद्राच्या पृष्ठभागावर पोहचेल.
इस्रोचे मिशन ऑपरेशन कॉम्प्लेक्स टेलीमेट्री, ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्क चांद्रयानच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे. येथून कमांड पाठवून चांद्रयान-3 चा वेग नियंत्रित केला जात आहे. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करताना कोणतीही अडचण येवू नये तसेच यान चंद्रावरील गुरुत्वाकर्षणाचा यावर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी वेग कमी कमी करतच यान चंद्राच्या पृष्ठभागाकडे जात आहे.
17 ऑगस्ट रोजी प्रोपल्शन मॉड्यूल आणि लँडर मॉड्यूल वेगळे होतील. 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5.47 वाजता चांद्रयानचे लँडिंग केले जाईल. लँडिंग यशस्वी झाल्यानंतर रोव्हर प्रयोगासाठी लँडरमधून बाहेर येईल. प्रोपल्शन मॉड्यूल, लँडर आणि रोव्हर यामुळे सध्या चांद्रयान 3 चे एकूण वजन जवळपास 3 हजार 900 किलो इतके आहे. मात्र, चंद्राच्या पृष्ठभागाकडे लँडिग करताना चांद्रयान 3 चे वजन कमी होणार आहे. प्रोपल्शन मॉड्यूलचे वजन सर्वात जास्त आहे, म्हणजे 2148 किलो इतके आहे. लँडर मॉड्यूलचे वजन 1752 किलो आहे. तर, रोव्हर प्रज्ञानचे वजन केवळ 26 किलो आहे. लँडिंग करण्यापूर्वी, चांद्रयानचे प्रोपल्शन मॉड्यूल वेगळे केले जाईल, म्हणजे यानाचे वजन 2100 किलो इतक होईल.