चिप्सवर रेषा का बनवल्या जातात? तुम्हाला माहितीय यामागचं कारण? जाणून वाटेल आश्चर्य

बऱ्याच चीप्सना तुम्ही अशा रेषा असल्याचे पाहिले असेल, परंतु या अशा रेषा का बनवल्या जातात यामागचं कारण तुम्हाला माहितीय का?

Updated: Aug 14, 2022, 07:20 PM IST
चिप्सवर रेषा का बनवल्या जातात? तुम्हाला माहितीय यामागचं कारण? जाणून वाटेल आश्चर्य title=

मुंबई : लहान मुलं असोत किंवा मोठी माणसं चिप्स खाण्याचा मोह कोणीही थांबवू शकत नाहीत. हे चिप्स चवीला फारच टेस्टी लागतात आणि स्नॅक्स म्हणून हलकं-पुलकं खाणं म्हणून फारच चांगलं आहे. ज्यामुळे बहुतेक लोक पार्टी किंवा पिकनिकला गेल्यावर चिप्स खातात. याशिवाय प्रवासात किंवा सिनेमा बघतानाही लोकांना टाईपास म्हणून चिप्स खायला लोकांना फार आवडतात. यामध्ये तुमच्या चवी प्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे चिप्स बाजारात उपलब्ध आहेत. परंतु तुम्ही कधी या चिप्सना नीट पाहिलं आहे का?

बऱ्याच चीप्सना तुम्ही अशा रेषा असल्याचे पाहिले असेल, परंतु या अशा रेषा का बनवल्या जातात यामागचं कारण तुम्हाला माहितीय का? तुम्हाला यामागचं कारण फक्ट डिझाइन आहे असं वाटत असेल तर तसं नाहीय... आज आम्ही तुम्हाला त्यामागचं खरं कारण सांगणार आहोत.

आम्ही तुम्हाला सांगतो की 90 च्या दशकापर्यंत बटाट्याचं चिप्स घरी बनवलं जात होतं. त्यावेळी चिप्सवर कोणत्याही प्रकारची रेषा नव्हती.

परंतु हे चिप्स जेव्हा बाजारात विकण्यासाठी आणले गेले तेव्हा त्यावर अशा रेषा आणल्या गेल्या. वास्तविक यामागे दोन महत्त्वाची कारणे आहेत.

1. चिप्सवर रेषा बनवल्या जातात जेणेकरून चिप्स चवदार बनवण्यासाठी जे मसाले वापरले जातात, ते मसाले या ओळींमध्ये साठवले जातात. जर या चिप्समध्ये रेषा नसतील तर त्यावर मसाले राहाणार नाहीत. तसेच या रेषांमुळे चिप्सच्या प्रत्येक पॅकेटमधील प्रत्येक चिप्सची चव सारखीच राहते.

2. याशिवाय, चिप्सवर रेषा देखील बनवल्या जातात जेणेकरून चिप्सचं एकमेकांसोबत घर्षण होणार नाही आणि त्यांचा चुरा होणार नाही. यासोबतच चिप्स अधिक कुरकुरीत होण्यासाठी लाईन्सही बनवल्या जातात, कारण त्यावर रेषा बनवल्यानंतर चिप्स खाताना त्या रेषांच्या जवळ तुटतात, जेणेकरून लोकांना चिप्सच्या क्रंचचा आनंद घेता येतो.