नवी दिल्ली : कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत चालले आहे. यामुळे आर्थिक, सामाजिक, आरोग्य अशा सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. यातून बाहेर येणाऱ्यासाठी कोरोना वॉरियर्ससोबत अनेक हात समोर येत आहेत. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत करणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. दरम्यान एका आमदाराने देखील एक कौतूकास्पद निर्णय घेतला आहे. नादौनचे आमदार आणि माजी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सुखविंद्र सिंह सूक्खू यांनी कोरोना संकट जाईपर्यंत एक रुपया पगार घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
विधानसभा अध्यक्ष विपिन सिंह परमार यांना पत्र लिहून त्यांनी ही मागणी केली आहे. जोपर्यंत कोरोना मुळासकट जात नाही तोपर्यंत पगारातील केवळ १ रुपयाच घेणार असल्याचे सुक्खू यांनी सांगितले. उरलेला पगार हा कोरोना विरोधात लढण्यासाठी खर्च केला जाणार आहे.
याआधी हमीरपूर मेडीकल कॉलेजमध्ये कोरोना संशोधनासाठी लागणाऱ्या मशिन खरेदीचा खर्च करण्याचे निर्णय त्यांनी जाहीर केला होता.