Covid-19 update: देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रूग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसतेय. दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्ण वाढत असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या अपडेटनुसार, देशात गेल्या 24 तासांमध्ये 605 रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान कोरोनाच्या संक्रमणामुळे 4 लोकांना त्यांचा जीव गमवावा लागणार आहे.
केंद्रीय स्वाथ मंत्रायलयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये देशात कोरोनाचे 605 नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. यावेळी 4 रूग्णांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, कोविड संसर्गामुळे मृत्यू झाल्यांमध्ये केरळमधील दोन आणि कर्नाटक आणि त्रिपुरातील प्रत्येकी एक रुग्ण आहे. या 4 रूग्णांच्या मृत्यूंमुळे मृतांची संख्या 5,33,396 वर पोहोचलीये.
इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने दिलेल्या माहितीनुसार, 7 जानेवारीपर्यंत देशात लसीचे 11,838 डोस देण्यात आलेत. सध्या जानेवारी महिना सुरु असून देशात अनेक ठिकाणी थंडीचं वातावरण आहे. या परिस्थितीत जसजसा हिवाळा सुरू होतोय तसतसं आरोग्य तज्ञांना विषाणूजन्य संसर्ग, इन्फ्लूएंझा आणि COVID-19 प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाल्याचं दिसून येतंय.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, तापमान घसरण झाल्यामुळे तापमानामुळे हवेतील आर्द्रता वाढते आणि वाऱ्याचा वेग कमी होतो. परिणामी प्रदुषण वाढतं आणि अनेक प्रकारचे संसर्ग होऊ लागतात. दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकार नवीन Omicron sub variant JN.1 च्या प्रकरणांवर लक्ष ठेऊन आहे.
आरोग्य विभागाने माहिती दिली असून त्यानुसार, 7 जानेवारीपासून JN.1 सब व्हेरिएंटचे एकूण 682 नवीन प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील 199, केरळमधील 148, महाराष्ट्रातील 139, गोव्यातील 47, गुजरातमधील 36, आंध्र प्रदेशातील 30, राजस्थानमधील 30, तामिळनाडूतील 26, दिल्लीतील 21, ओडिशातील तीन, तेलंगणा आणि हरियाणातून 1-1 प्रकरणं नोंदवण्यात आलं आहे.