मुंबई : भारतात कोरोना लसीकरण सुरु झाल्यापासून ते आत्ता पर्यंत 23 हजांरांपेक्षा जास्त AEFI चे केसेस असल्याची नोंद झाली आहे. ही प्रकरणे देशातील 648 जिल्ह्यातील आहेत. त्यापैकी 700 प्रकरणे गंभीर आहेत. AEFI समितीने 498 गंभीर प्रकरणांचा तपास केला असता, त्यात रक्त गोठण्याच्या 26 केसेस समोर आले आहेत.
रक्त गोठण्याच्या सर्व केसेस या कोविशिल्ड लस दिलेल्या रुग्णांमध्ये आढळल्या आहे. AEFIकमिटीला कोवॅक्सिन लस घेणाऱ्या रुग्णांमध्ये एकही रक्त गोठण्याची तक्रार समोर आलेली नाही. यूकेमध्ये 4 केसेस 1 मिलियन मागे, तर जर्मनीत 10 केसेस 1 मिलियन मागे रक्त गोठण्याच्या समोर आल्या आहेत. आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक सल्लागार जारी केला आहे.
आरोग्य मंत्रालयाने आरोग्य सेवा कामगारांना आणि विशेषत: कोविशिल्ड घेणा-यांना सल्ला दिला आहे की, लस घेतल्यानंतर २० दिवसांपर्यंत AEFI ची तक्रार येऊ शकते आणि जर तक्रार आली तर त्या ठिकाणी संपर्क साधावा जेथून तुम्ही लस घेतली आहे. रक्त गोठण्याव्यतिरिक्त छातीत दुखणे, श्वास घ्यायला त्रास होणे, पोटदुखी, अशक्तपणा, दिसण्यात अडचण यासह इतरही अनेक समस्या उद्भवू शकतात. विशेष गोष्ट अशी आहे की, AEFIमधील कोवॅक्सिन लसींमध्ये रक्त गोठण्याची एकही घटना आढळली नाही.
भारतातील AEFIच्या आकडेवारीत असे दिसून आले आहे की, भारतात रक्त गोठण्याचे प्रकार दर मिलियन लोकांमागे 0.61% आहेत. तर AEFIचे ब्रिटनमधील 4 केस आणि जर्मनीमधील 10 केसेस दर मिलियन लोकांमागे नोंदवले गेले आहेत. 27 एप्रिल 2021 पर्यंत कोविशिल्ड लसींचे 13.4 कोटी पेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत. MoHFW सर्व COVID-19 लसींच्या सुरक्षिततेवर लक्ष ठेवून आहेत आणि संशयास्पद प्रतिकूल घटना सतत नोंदल्या जात आहेत.